चिपळूणमध्ये माजी सैनिकाचा मृतदेह बिलासाठी अडवला, नातेवाईकांचा रुग्णालयावर आरोप, शिवसेनेचा आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

कोविड संसर्ग झाल्याने खेड येथील रमेश मोरे या माजी सैनिकाला चिपळूणातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.  Ramesh More died due to covid

चिपळूणमध्ये माजी सैनिकाचा मृतदेह बिलासाठी अडवला, नातेवाईकांचा रुग्णालयावर आरोप, शिवसेनेचा आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा
रुग्णालय परिसरात जमलेली गर्दी
लक्ष्मीकांत घोणसे पाटील

| Edited By: Yuvraj Jadhav

Jun 18, 2021 | 11:23 PM

रत्नागिरी: कोविड संसर्ग झाल्याने खेड येथील रमेश मोरे या माजी सैनिकाला चिपळूणातील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.  12 दिवस उपचारानंतर त्यांचा काल मृत्यू झाला. उपचाराचं बील साडेचार लाख रुपये झालं होतं, नातेवाईकांनी 4 लाख भरलेही. मात्र, राहिलेले पैसे भरा अन्यथा रमेश मोरे यांचा मृतदेह मिळणार नाही, अशी अडवणूक येथील डॉक्टरांनी केली असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय. रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाईकांचा हा आरोप फेटाळला आहे. (Chiplun Siddhivinayak hospital Bill issue of ex-serviceman Ramesh More who died due to covid)

शिवसेना आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

माजी सैनिकाचा मृतदेह बिलासाठी अडवल्याचं समजताच शिवसेना तालुका प्रमुख प्रतापराव शिंदे आणि विनोद झगडे चांगलेच आक्रमक झाले. हॉस्पिटलच्या विरोधात आम्ही आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करू असा इशाराही त्यांनी दिला.

तक्रार आली तर कारवाई करु, प्रशासनाची भूमिका

दरम्यान, कोविड काळात ज्यादा बिल आकारणाऱ्या हॉस्पिटल विरोधात रीतसर तक्रार आल्यास कारवाई करू, अशी महिती येथील प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी दिली. काल रमेश मोरे यांच्या निधनानंतर सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाहेर चांगलाच गोधळ उडाला, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी घटनास्थळी जाऊन वातावरण शांत केले.

रुग्णालयानं आरोप फेटाळले

सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. पुजारी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. याउलट हॉस्पिटलमध्ये भरलेले पैसे नातेवाईक परत मागत होते, असा पलटवार पुजारी यांनी केलाय. तर काल सकाळी मृत्यू होऊनही रुग्णाचा मृतदेह सायंकाळी 7 वाजता ताब्यात मिळाला आणि मग अंत्यसंस्कार झाले.

इतर बातम्या:

Maharashtra Rain: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी पुढील 4 तास महत्त्वाचे , मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

पहिल्यांदा कमांडो म्हणून सैन्यात काम नंतर सॉफ्टवेअर कंपनीचे मालक, इस्त्राईलचे पंतप्रधान नफाताली बेनेट नेमके कोण?

VIDEO : महिलांच्या दोन गटांमध्ये तुफान वाद, पुरुषही एकमेकांना भिडले, नंतर थेट पोलीस स्टेशनबाहेर कोयते नाचवले

Chiplun Siddhivinayak hospital Bill issue of ex-serviceman Ramesh More who died due to covid

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें