Akola Curfew | अकोल्यात 21 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी वाढवली, पोलीस अधीक्षकांकडून बुलेटवरुन बंदोबस्ताची पाहणी

त्रिपुरा (Tripura Violence) येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत (Amravati) 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्याचे पडसाद अकोल्यातही (Akola Curfew) दिसून आले होते. त्यामुळे गेल्या 13 नोव्हेंबरपासून अकोला शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.

Akola Curfew | अकोल्यात 21 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी वाढवली, पोलीस अधीक्षकांकडून बुलेटवरुन बंदोबस्ताची पाहणी
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 8:57 AM

अकोला : त्रिपुरा (Tripura Violence) येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत (Amravati) 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. त्याचे पडसाद अकोल्यातही (Akola Curfew) दिसून आले होते. त्यामुळे गेल्या 13 नोव्हेंबरपासून अकोला शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता 21 नोव्हेंबरपर्यंत या संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे.

यामध्ये सर्व नियम कायम आहेत. पण यापुढे धरणे, आंदोलन किंवा मोर्चे असतील या सर्वांना निर्बंध असणार आहेत. मात्र. आता सायंकाळी सात वाजेनंतर कोणीही बाहेर दिसल्यास किंवा संचारबंदीचे नियम मोडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

अकोल्यात पोलीस अधीक्षकांची बुलेट वारी

Akola Superintendent of Police G. Sridhar

Akola Superintendent of Police G. Sridhar

आजपासून पोलिसांनी नियमात सक्ती केली आहे. तर सायंकाळी 7 वाजेनंतर रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप दिला आहे.

मध्यरात्रीनंतर शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनचा परिसर, महत्वाचे चौक, रस्त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर  (Akola Superintendent of Police G. Sridhar) यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची पाहणी केली. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन स्वतः बुलेट चालवत अधीक्षकांनी पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली.

अमरावती शहरातील संचारबंदी शिथिलतेत पुन्हा फेरबदल

अमरावती शहरातील संचारबंदी शिथिलतेत पुन्हा फेरबदल करण्यात आले आहेत. आता जीवनावश्यक वस्तू खरेदी आणि कृषी केंद्र उघडण्यास सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत तर दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी हे नवीन आदेश जारी केले आहेत.

अमरावतीत संचारबंदी शिथिलतेबाबद संभ्रम अद्याप कायम आहे. कारण, शहरातील इंटरनेट सेवा बंद असल्याने नव्या नियमांची माहिती लोकांपर्यंत पोहचत नाहीये.

अकोटमध्येही शुक्रवारपर्यंत संचारबंदी कायम

अकोला जिल्हातल्या अकोटमध्ये शुक्रवारपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. अकोट शहरातील एका भागात 12 नोव्हेंबरला दगडफेकीची घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने 13 आणि 14 नोव्हेंबर अशी 24 तासांची संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान,आता पुन्हा 19 नोव्हेंबर शुक्रवारपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. तर, अकोट शहरातील इंटरनेट सेवा 19 नोव्हेंबरपर्यंत बंदच असणार आहे.

काय घडलं होतं अमरावतीत?

अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी अमरावतीत मुस्लिम समाजाने काढलेला मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. या हिंसक कारवायांचा निषेध करत भारतीय जनता पार्टीने अमरातीत 13 नोव्हेंबर रोजी अमरावती बंदचे आवाहन केले. यातदेखील भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. त्यामुळे शनिनारी 1 वाजेपासून अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

12 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 11, तर 13 नोव्हेंबरच्या घटनांमध्ये 24 असे एकूण 35 गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत. तोडफोड व जाळपोळ प्रकरणी हे 35 गुन्हे नोंदवण्यात आले असून, एकूण 188 संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी दिलीये.

संबंधित बातम्या :

अमरावतीपाठोपाठ अकोल्यातील अकोटमध्येही संचारबंदी, दगडफेकीच्या घटनेनंतर तात्काळ निर्णय

अमरावती हिंसाचारः माजी मंत्री अनिल बोंडेंसह भाजप नेत्यांना अटक, पालकमंत्र्यांचा इशारा, दंगल घडवणाऱ्यांना सोडणार नाही!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.