मराठी अधिकाऱ्यानं ड्रग्ज रॅकेटच्या मुळाशी जावं, ते उध्वस्त करावं, तसं होताना दिसत नाही: दीपक केसरकर

50 ग्रॅम 100 ग्रॅम ड्रग्ज पकडायचे आणि सेलिब्रिटींच्या छोट्या-मोठ्या मुलांना उभं करायचं आणि त्यांना या प्रकरणात अडकावयचं, असं सुरु आहे. त्यानंतर ते जामीनावर सुटतात, असं दीपक केसरकर म्हणाले.

मराठी अधिकाऱ्यानं ड्रग्ज रॅकेटच्या मुळाशी जावं, ते उध्वस्त करावं, तसं होताना दिसत नाही: दीपक केसरकर
दीपक केसरकर
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 1:46 PM

सिंधुदुर्ग: देशातून ड्रग्ज हद्दपार करणं ही सेनेची भूमिका असल्याचं माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. 50 ग्रॅम 100 ग्रॅम ड्रग्ज पकडायचे आणि सेलिब्रिटींच्या छोट्या-मोठ्या मुलांना उभं करायचं आणि त्यांना या प्रकरणात अडकावयचं, असं सुरु आहे. त्यानंतर ते जामीनावर सुटतात, पुढं काहीचं होत नाही. ड्रग्ज या देशातून हद्दपार झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. यासाठी गुजरात वरून येणारं ड्रग्स रॅकेट आधी उध्वस्त करा, असं दीपक केसरकर म्हणाले.

एका अधिकाऱ्यावरुन सेनेवर प्रश्नचिन्ह नको

एका मराठी अधिकाऱ्यावरून शिवसेनेची भूमिका मराठी माणसाविरोधात आहे, अशी कोणी टीका करू नये. आम्हाला त्या मराठी अधिका-याबद्दल आदर आहे. त्या अधिकाऱ्याने आपलं कर्तव्य पार पाडावे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र, उगाचच एका व्यक्ती वरून शिवसेनेच्या मराठी भूमिका विषयी कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, असा सणसणीत टोला माजी गृह राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भाजपला लगावला आहे.

दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?

मला असं वाटत नाही की त्या अधिकाऱ्यांवर, क्राती रेडकर यांच्यावर कुणी टीका केली, असं वाटत नाही. त्यांनी त्यांचं काम, कर्तव्य केलं पाहिजे. ड्रग्ज कुठून येतं त्याचं मूळं कुठंय हे उद्धवस्त केलं पाहिजे. लहान मुलांना गुन्हेगार बवण्यापेक्षा त्यांना सुधारण्यासाठी कामं करावं. मराठी अधिकाऱ्यांवर कुणी टीका केली नाही. अधिकाऱ्यांनी रॅकेटच्या मुळाशी जावं, ते उध्वस्त करावं, अशी अपेक्षा दीपक केसरकर यांनी व्यक्त केलीय.

नारायण राणेंनी कोकणचा विकास करावा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळालेले मंत्रिपद हे केंद्रातील मोठं मंत्रिपद आहे. त्याचा उपयोग त्यांनी कोकणसाठी आणि कोकणी जनतेसाठी करावा. हे पद जर मला मिळालं असतं तर आपण कोकणचा कायापालट केला असता, असं नारायण राणेंचे कट्टर विरोधक माजी मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय.

कोकणाचा कायापालट करणं राणेंच्या हातात

नारायण राणेंनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करून जे मंत्रिपद मिळवलं आहे. त्याच्या माध्यमातून कोकणचा काया पालट करावा ते त्यांच्या हातात आहे. त्यांनी जर विकास केला तर आम्ही त्यांचे निश्चितच कौतुक करू, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे.

इतर बातम्या:

नारायण राणेंचं मंत्रिपद मोठं त्यांनी कोकणचा कायापालट करावा, कट्टर विरोधक केसरकरांची अपेक्षा

औरंगाबादेत आजपासून 9 दिवस मेगा लसीकरण, मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेला विद्यार्थी, शिक्षकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन

Deepak Kesarkar said drugs should be removed from India but drugs racket should be exposed

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.