उस्मानाबाद शहरात होणार भुयारी गटार योजना, 300 किमी अंतर्गत लाईन, आगामी 20 वर्षांचे नियोजन, नगराध्यक्षांचा मेगाप्लॅन

शहराच्या विविध विकास कामांसाठी गेल्या 6 महिन्यात राज्य सरकारने 208 कोटी रुपयांचा भरीव निधी दिला असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी दिली. उस्मानाबाद शहरात अंतर्गत भुयारी गटार योजनासह रस्ते, पर्यटन विकास कामांसाठी हा निधी देण्यात आला  आहे.

उस्मानाबाद शहरात होणार भुयारी गटार योजना, 300 किमी अंतर्गत लाईन, आगामी 20 वर्षांचे नियोजन, नगराध्यक्षांचा मेगाप्लॅन
मकरंद राजे निंबाळकर, नगराध्यक्ष उस्मानाबाद

उस्मानाबाद : शहराच्या विविध विकास कामांसाठी गेल्या 6 महिन्यात राज्य सरकारने 208 कोटी रुपयांचा भरीव निधी दिला असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदू राजे निंबाळकर यांनी दिली. उस्मानाबाद शहरात अंतर्गत भुयारी गटार योजनासह रस्ते, पर्यटन विकास कामांसाठी हा निधी देण्यात आला  आहे.

आगामी 2 महिन्यात भुयारी गटारांचे काम सुरू करण्यात येईल या योजनेच्या पूर्णत्वास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच शहरातील अन्य विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीकडे 25 कोटी रुपयांचा निधी मागितला असल्याची माहिती नगराध्यक्ष राजे निंबाळकर यांनी दिली. हा निधी दिल्याबद्दल शासन आणि प्रशासनाचे आभार मानले.

भुयारी गटार योजना लवकरच सुरू होणार

उस्मानाबाद शहरवासीयांचे स्वप्न असलेली भुयारी गटार योजना आता लवकरच सुरू होणार आहे. भुयारी योजनेसाठी प्रति व्यक्ती 130 लिटर पाणी उपलब्धतेसह अन्य निकष पूर्ण केले आहेत. अंतर्गत भुयारी योजनेत उस्मानाबाद शहरातील जवळपास 25 हजार घरे समाविष्ट होणार असून 300 किमी पाईपलाईन असणार आहे. प्रत्येक 33 मीटरवर एक चेंबर असणार असून या आगामी 20 वर्षची लोकसंख्या व हद्दवाढ स्तिथी लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे.

या योजनेमुळे सांडपाणी रस्त्यावर न साचल्याने डेंगू, मलेरियायासह अन्य साथीचे आजारावर नियंत्रण मिळविता येणार आहे. भुयारी गटार योजना पूर्ण झाल्यावर उस्मानाबाद शहरातून  वाहणाऱ्या भोगावती नदीच्या दोन्ही बाजुला शुशोभीकरण, वॉकिंग ट्रॅक,घाट करणे शक्य होणार आहे असे नगराध्यक्ष निंबाळकर म्हणाले.

सांडपाण्यावरचा पुनर्वापर प्रक्रिया प्रकल्प सुरु होणार

भुयारी गटार योजनेतील सांडपाण्यावर 2 कोटी 20 लाख लीटर क्षमतेचा पाणी पुनर्वापर प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळ व पाणी टंचाईकाळात याचा वापर करता येणार आहे.

शहरातील भुयार गटारीची कामे दोन टप्प्यात करण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होताच ते कामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती मकरंद राजेनिंबाळकर सांगितली.

कार्यकाळ संपण्याअगोदर 25 ते 30 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून घेणार

दरम्यान, शहरातील अनेक विकास कामे प्रलंबित होती. ती कामे करण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीकडे मागणी करून पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे त्या कामास देखील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. भुयारी गटार केल्यानंतर शहरातील इतर कामे करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीस तांत्रिक मान्यता घेतली आहे. तसेच माझा कार्यकाळ संपण्यापूर्वी 25 ते 30 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगामी काळात विकासकामांचा धुमधडाका

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय ते तेरणा महाविद्यालय या राष्ट्रीय महामार्गपासून पूर्वेकडील भाग गोदावरी खोऱ्यात तर पश्चिमेकडील भाग कृष्णा खोऱ्यात येत आहे. गोदावरी खोऱ्यातील व कृष्णा खोऱ्यातील सर्व सांडपाणी हे भुयारी गटाराद्वारे भोगावती नदीमध्ये आणून सोडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिमेकडील कृष्णा खोऱ्यातील कामे होणार आहेत. धारासूर मर्दिनी देवस्थान परिसर विकसित करणे, हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला अली दर्गा येथे भक्तनिवास बांधण्यासाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

(Development plan of Osmanabad city president makrand Raje Nimbalkar)

हे ही वाचा :

ICHR ने पंडित नेहरुंचं चित्र वगळलं, राऊत भडकले, म्हणाले, ‘ज्यांना इतिहास घडवता नाही ती माणसं इतिहास पुसतात’

Mumbai Rains Maharashtra Weather : कोकणातील 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात कुठे कुठे पाऊस होणार?

नांदेडच्या शिक्षकाच्या चित्रपटाला NCERT चा सर्वोकृष्ट लघु चित्रपटाचा पुरस्कार, सर्वत्र कौतुक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI