Video: जेव्हा राजकीय कार्यकर्त्यांच्या गर्दीत खिसे कापू घुसतो तेव्हा अमरावतीच्या राड्याला रंग चढतो, नेमकं काय घडलं?

अमरावती जिल्हा बँकेत सहकार पॅनेलने बाजी मारली. साहजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या आनंदोत्सवाला सुरुवात केली. पण याच मिरवणुकीच्या कार्यक्रमात एक खिसेकापूची एन्ट्री झाली.

Video: जेव्हा राजकीय कार्यकर्त्यांच्या गर्दीत खिसे कापू घुसतो तेव्हा अमरावतीच्या राड्याला रंग चढतो, नेमकं काय घडलं?
अमरावतीत सहकार पॅनेलच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज


अमरावती :  अमरावती जिल्हा बँकेत सहकार पॅनेलने बाजी मारली. साहजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या आनंदोत्सवाला सुरुवात केली. पण याच मिरवणुकीच्या कार्यक्रमात एक खिसेकापूची एन्ट्री झाली. त्याने जि.प. अध्यक्ष बबलू देशमुख आणि पॅनेलप्रमुखांचं अभिनंदन करताना त्यांचाच खिसा कापण्याचा प्रयत्न केला. मात्र चाणाक्ष कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी भुरट्या खिसेकापूला पकडून मार दिला. पुढे पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि पुढे जो राडा झाला त्याचं रुपांतर लाठीचार्जमध्ये झालं. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांच्या मुलाला आणि पुतण्यालाही सोडलं नाही. पोलिसांनी त्यांनाही हाताखालून काढलं…!

नेमकं प्रकरण काय?

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतमोजणी आज सकाळपासून गाडगे महाराज सभागृहात सकाळ पासून सुरु झाली. दुपारी 2 वाजताच्या सुमारास सहकार पॅनलचे काही कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करीत असताना पोलिसांनी त्यांना हटकले. या कारणावरून पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद सुरु असताना बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख व सहकार पँनलचे प्रमुख यांचं एका व्यक्तीने अभिनंदन केलं. त्याच वेळेस त्यांचा खिसा कापण्याचा प्रयत्न झाला. खिसेकापू त्याचक्षणी कार्यकर्त्यांना दिसला आणि कार्यकर्त्यानी संबंधित खिसेकापूला मारहाण सुरू केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना समज दिली मात्र कार्यकर्त्यांसोबत
जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांचा मुलगा पुतण्या याची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.

याच वेळी झालेली गर्दी पांगविण्याकरिता पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला. यात बबलू देशमुख यांच्यासह पुतण्यालाही ही लाठीचार्जचा सामना करावा लागला.
या प्रकरणी पोलीस संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे .

अमरावती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या मुलावर आणि पुतण्यासह एकावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. बबलू देशमुख हे निवडणूक जिंकल्यावर मतमोजणी ठिकाणी आले तेव्हा फटाके फोडण्यात आले. पोलिसांनी मनाई केली असता पोलिसांसोबत वाद घातल्याने प्रकरण चिघळले. पोलीस बबलू देशमुख यांच्या मुलावर आणि पुतण्यासह एकावर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा :

Amravati DCC Bank Election : अमरावती जिल्हा बँक निवडणूक; विजयानंतर बच्चू कडूंची पाहिली प्रतिक्रिया

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI