गोंदियाच्या विद्यार्थिनीची गगनभरारी, इंटरनॅशनल मॅथेमेटिक ऑलिम्पियाड स्पर्धेत जगात तिसरा तर देशात पहिला क्रमांक

गोंदिया शहराच्या कुंभारे नगर भागात राहणाऱ्या 15 वर्षीय आयुषी उके या तरुणीने जागतिक पातळीवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथेमेटिक ओलिम्पियाड स्पर्धेत जगात तिसरा तर देशातून पहिला क्रमानं पटकाविला आहे. ही परीक्षा ऑक्टोबर 2020 मध्ये घेण्यात आली होती. तर, 6 ऑक्टोबर 2021 ला या स्पर्धेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

गोंदियाच्या विद्यार्थिनीची गगनभरारी, इंटरनॅशनल मॅथेमेटिक ऑलिम्पियाड स्पर्धेत जगात तिसरा तर देशात पहिला क्रमांक
Ayushi Uke
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 10:56 AM

गोंदिया : गोंदिया शहराच्या कुंभारे नगर भागात राहणाऱ्या 15 वर्षीय आयुषी उके या तरुणीने जागतिक पातळीवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथेमेटिक ओलिम्पियाड स्पर्धेत जगात तिसरा तर देशातून पहिला क्रमानं पटकाविला आहे. ही परीक्षा ऑक्टोबर 2020 मध्ये घेण्यात आली होती. तर, 6 ऑक्टोबर 2021 ला या स्पर्धेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

आयुषी उके गोंदियाच्या गुजराती शाळेत 9 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. आयुषीला लहानपणापासूनच गणित विषयाची आवड असून कितीही मोठे गणित असो ती ते सहज सोडवू शकते. इतकेच नाही तर ती इतर वर्ग मित्रांच्या मनात देखील गणित विषयाची असलेली भीती दूर कारायला मदत करते.

58 व्या मिनिटाला 60 ही गणितं सोडवली

तिच्या अभ्यास खोलीत सर्वत्र गणिताचे फॉर्म्युले चिकटविलेले आहेत. आयुषीला वर्ष 2020 मध्ये इंटरनॅशनल मॅथेमेटिक ओलिम्पियाड परीक्षेविषयी माहिती मिळाली होती. तिने तिचे गणित विषयाचे वर्ग शिक्षक अलीम सय्यद यांच्या मदतीने इमो कडे 9 व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या गटातून ऑनलाईन नामांकन केले. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये ऑनलाईन परीक्षा दिली. 60 मिनिटांची ही ऑनलाईन परीक्षा असून ती 60 मार्कांची होती. त्यात 58 व्या मिनिटाला आयुषीने ही 60 ही गणितं ऑनलाईन पद्धतीने सोडविली. नुकतंच 6 ऑक्टोबर 2021 ला या परीक्षेचा निकाल आला. आयुषीने जगात तिसरा तर देशातून पहिला क्रमांक पटकाविला.

आयुषीला भविष्यात कलेक्टर व्हायचं आहे. यासाठी ती आतापासूनच तयारी करत आहे. तर आयुषीची आई या देखील उच्च शिक्षित असून त्या आयुषीला मदत करतात. आपली मुलगी जिल्हा पातळीवर किंवा राज्य पातळीवर प्रथम येईल असे आयुषीच्या आईला वाटत होते. मात्र, आयुषीच्या परीक्षेचा निकाल आल्यावर आई वर्षा उके यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

आयुषी ही दिव्यांग असून सुद्धा तिच्या वडिलांनी शिक्षणाप्रति असलेली तिची चिकाटी पाहता तिला शिक्षणा करिता जी काही पुस्तकं लागतत ते वेळेवर घेऊन देतात. आयुषीने या पुस्तकांचे चीज करुन दाखविल्याचे ते सांगतात.

मनात जर जिद्द आणि चिकाटी असेल तर यश मिळविण्यास वेळ लागत नाही. हेच गोंदियातील 9 व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या 15 वर्षीय आयुषी उके या तरुणीने साध्य करुन दाखविले आहे. तर आयुषीने केलेल्या कामगिरीमुळे तिने मिळविलेल्या यशा बद्दल तिचे ठीक ठिकाणी सत्कार देखील होत आहेत.

संबंधित बातम्या :

स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनी वाशिमचा 19 वर्षीय यश आफ्रिकेतील किलीमांजारोवर तिरंगा फडकवणार!

नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा, कोंढ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी, अमेरिकेत विमान उडवलं!

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.