सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची मान्यता, ठाकरे सरकारचा राणेंना पुन्हा दे धक्का

कोकणात गेली 25 वर्षे शासकीय महाविद्यालयाची मागणी होत होती. आज ही मागणी मान्य करीत 100 मुलांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग वासियांची प्रतीक्षा संपली आहे. सिंधुदुर्ग वासियांना खऱ्या अर्थाने बाप्पा पावला असल्याची प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.

सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची मान्यता, ठाकरे सरकारचा राणेंना पुन्हा दे धक्का
सिंधुदुर्गातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची मान्यता

सिंधुदुर्ग : गेल्या काही वर्षांपासून मागणी होत असलेल्या सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीने अखेर आज मान्यता दिली. या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस डॉक्टरांचा पहिला वर्ग सुरू होतील, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज दिली. गेली पंचवीस-तीस वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत होता. काहींनी लोकांसाठी नाही तर स्वतः साठी विद्यालय मंजूर करून घेतले होते, असा टोलाही विनायक राऊत यांनी नारायण राणेंना लगावला आहे. नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेज नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देत ठाकरे सरकारने राणेंना पुन्हा दे धक्का दिला. (Government Medical College at Sindhudurg got NMC approval)

कोकणात गेली 25 वर्षे शासकीय महाविद्यालयाची मागणी होत होती. आज ही मागणी मान्य करीत 100 मुलांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग वासियांची प्रतीक्षा संपली आहे. सिंधुदुर्ग वासियांना खऱ्या अर्थाने बाप्पा पावला असल्याची प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देत त्यांनी दिलेला शब्द अखेर पाळला असून गणपती बाप्पा पावला असल्याचे विनायक राऊत म्हणाले. यावेळी आमदार वैभव नाईकही उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी दिले होते निर्देश

सिंधुदुर्गच्या ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी दिले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले होते. या बैठकीला उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, वैद्यकीय शिक्षण सचिव संजय कुमार, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Government Medical College at Sindhudurg got NMC approval)

इतर बातम्या

ठाकरे सरकार अस्थिर करण्याच्या आरोप! आता रामदास कदमांचं मनसे नेत्याला प्रत्युत्तर

लाखो रुपयांचे दागिने चोरीचा उलगडा, पहाटे मॉर्निंग वॉकल्या जाणाऱ्या वृद्धांना लक्ष्य करणारे चोरटे जेरबंद, पोलिसांची लाजवाब कामगिरी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI