शासकीय लसीचा खासगी वापर, आरोग्य अधिकाऱ्याकडून कंपनीत लसीकरण, कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

जिल्ह्यात लसीकरणाचा सुरू असलेला काळाबाजार शिवसेनेचे बोईसर विधानसभा संघटक नीलम संखे यांनी पुन्हा एकदा समोर आणला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सियाराम या कंपनीत पैसे घेऊन लसीकरण करत असल्याचा आरोप केला जात होता.

शासकीय लसीचा खासगी वापर, आरोग्य अधिकाऱ्याकडून कंपनीत लसीकरण, कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी
VACCINATION

पालघर : जिल्ह्यात लसीकरणाचा सुरू असलेला काळाबाजार शिवसेनेचे बोईसर विधानसभा संघटक नीलम संखे यांनी पुन्हा एकदा समोर आणला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सियाराम या कंपनीत पैसे घेऊन लसीकरण करत असल्याचा आरोप केला जात होता. या सर्व प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सियाराम कंपनीत दाखल होत कारवाई करण्याची मागणी केली आहे. (health officer asking rupees for corona vaccination in industrial company in palghar district)

कंपनीतील कामगारांकडून प्रत्येकी डोसमागे अडीचशे रुपये घेतले

मिळालेल्या माहितीनुसार वैद्यकीय अधिकाऱ्याने लसीकरण करताना कंपनीतील कामगारांकडून प्रत्येकी डोसमागे अडीचशे रुपये घेतले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राला आलेला लसीचा साठा खासगी कंपनीत नेला जात होता. तसेच खासगी कंपनीतील कामगारांकडून पैसे घेऊन त्यांना लस दिली जात होती. हा प्रकार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना समजला. त्यानंतर शिवसेचे काही पदाधिकारी कंपनीमध्ये दाखल होताच काही कामगारांनी पळ काढला. पालघर सारख्या ग्रामीण जिल्ह्यात आधीच लसीचा तुटवडा आहे. त्यात अधिकाऱ्यांकडून लसींचा केला जाणारा काळा बाजार वारंवार उघडकीस येत आहे. शिवसेनेचे बोईसर विधानसभा संघटक नीलम संखे यांनी हा प्रकार समोर आणला आहे.

पैशांची मागणी होत असल्यामुळे करावे तरी काय ?

आधीच लसींचा तुटवडा आहे. त्यातही लसीसाठी अशा प्रकारे पैसे उकळले जात असल्यामुळे नागरिक हैराण आहेत. सरकारी अधिकाऱ्यांकडूनच पैशांची मागणी होत असल्यामुळे काय करावे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. दरम्यान, समोर आलेल्या या प्रकाराची दखल घेऊन उचित कारवाई करावी अशी मागणी नीलम संखे यांनी केली आहे.

देशात रुग्णसंख्येत वाढ 

दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत अल्पशी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात देशात 31 हजार 382 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 318 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या गेल्या सहा महिन्यांतील निचांकावर पोहोचली आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 31 हजार 382 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 318 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 32 हजार 542 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

इतर बातम्या :

Maharashtra School Reopen: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला मान्यता, ‘या’ तारखेपासून शाळा सुरु होणार

सोमय्यांना इशारा देत सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना फुल सपोर्ट, म्हणाले, ‘बदनामीचा कट हाणून पाडू’

Argan Oil Benefits : आर्गन तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत गुणकारी, वाचा!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI