हिंगोली जिल्ह्याला केंद्राकडून 70 कोटींचा निधी; ग्रामपंचायतींमध्ये वाटपाला सुरुवात

Hingoli district | हिंगोली जिल्ह्यासाठी 15 व्या वित्त आयोगाचा एकूण 70 कोटी निधी केंद्राकडून प्राप्त झाला होता त्या पैकी 10 टक्के प्रमाणे 7 कोटी पंचायत समिती आणि 7 कोटी जिल्हा परिषद स्तरावर वितरित करण्यात आला व उर्वरित 80 टक्के प्रमाणे 56 कोटी ग्रामपंचात स्तरावर वितरित करण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्याला केंद्राकडून 70 कोटींचा निधी; ग्रामपंचायतींमध्ये वाटपाला सुरुवात
PM Modi

हिंगोली: जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतीपैकी 15 व्या वित्त आयोगाच्या PFMS या प्रणालीद्वारे ग्रामसेवक आणि सरपंच (मेकर आणि चेकर) यांच्या लॉगइनमधून जिल्ह्यातील एकूण 49 ग्रामपंचायतींच्या गुत्तेदार यांच्या खात्यात डिजीटल पेमेंट करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 15 व्या वित्त आयोग या हेडखाली राज्यातल्या 27 हजार ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी निधी वर्ग केलाय. हे सरपंच आणि ग्रामसेवक यांचं संयुक्त खातं आहे. (Central govt 70 crore fund for Hingoli district)

केंद्र सरकारने याच्यामध्ये कोणतेही मध्यस्थी न ठेवता थेट निधी खर्च खर्च करण्याचे आदेश सरपंच आणि ग्रामसेवकांना दिलेले आहेत. पूर्वी केंद्र सरकारचा निधी खर्च करण्यासाठी चेक पेमेंटची प्रणाली वापरण्यात येत होती. मात्र 2020-2021 पासून अधिक पारदर्शकता येण्यासाठी केंद्र शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय लागू केलाय.

हिंगोली जिल्ह्यासाठी 15 व्या वित्त आयोगाचा एकूण 70 कोटी निधी केंद्राकडून प्राप्त झाला होता त्या पैकी 10 टक्के प्रमाणे 7 कोटी पंचायत समिती आणि 7 कोटी जिल्हा परिषद स्तरावर वितरित करण्यात आला व उर्वरित 80 टक्के प्रमाणे 56 कोटी ग्रामपंचात स्तरावर वितरित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकूण 563 ग्रामपंचायत पैकी 447 ग्रामपंचायत तिचे डिजिटल साईन प्रक्रिया पूर्ण झालेली असून 116 ग्रामपंचायती अजून प्रलंबित आहेत जिल्ह्यातील एकूण 49 ग्रामपंचायतींनी गुत्तेदार यांच्या खात्यात PFMS प्रणालीद्वारे यशस्वी पेमेंट केले आहे. उर्वरीत सर्व ग्रामपंचायतींचे तालुकानिहाय कॅपमोड मध्ये dsc म्यापिंग करून पुढील 10 दिवसात सर्व पंचायतीचे पैसे गुत्तेदार यांच्या खात्यात PFMS प्रणालीद्वारे पाठवण्य ची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषेदेचे कार्यकारी अधिकारी बिनोद शर्मा यांनी दिली.

(Central govt 70 crore fund for Hingoli district)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI