Coroanvirus: कोरोनामुळे ठप्प झालेल्या आंतरराज्य बससेवेला पुन्हा प्रारंभ

Inter state bus service | आज दिवसभरात महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जळगाव विभागातील चोपडा- सुरत, चाळीसगाव-सुरत, अमळनेर-बडोदा, पाचोरा- सुरत, एरंडोल- सुरत, जळगाव -वापी,जामनेर- सुरतला बसेस रवाना झाल्या आहेत.

Coroanvirus: कोरोनामुळे ठप्प झालेल्या आंतरराज्य बससेवेला पुन्हा प्रारंभ
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 12:47 PM

नंदूरबार: कोरोनाचा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने बस सेवा बंद करण्यात आली होती.परंतु कोरोणा नियंत्रित झाल्याने सात जून पासून राज्यातील बस सेवा सुरू करण्यात आली होती. यात आंतरराज्य बस सेवा मात्र बंद होती. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत होते या अनुषंगाने प्रवाशांनी आंतरराज्य बससेवा (ST Bus) सुरू करावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने आज पासून आंतरराज्य बस सेवा जळगाव विभागाने सुरू केली आहे. (Inter state bus service resumes in Maharashtra)

महाराष्ट्र राज्य प्रमाणे गुजरात राज्य परिवहन महामंडळाने देखील महाराष्ट्र राज्यात गुजरातच्या बसेस सुरू केल्या आहेत. आज दिवसभरात महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात जळगाव विभागातील चोपडा- सुरत, चाळीसगाव-सुरत, अमळनेर-बडोदा, पाचोरा- सुरत, एरंडोल- सुरत, जळगाव -वापी,जामनेर- सुरतला बसेस रवाना झाल्या आहेत. तर गुजरात राज्यातील सुरत-शिर्डी, सुरत-मालेगांव,सुरत-नवापूर बसेस महाराष्ट्र सुरू झाल्या आहेत. या निर्णयाने महामंडळाचे आर्थिक चक्र गतिमान होईल गेल्या अनेक दिवसापासून बस सेवा बंद असल्याने महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते.

देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 9 हजारांनी वाढ

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 9 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 43 हजार 733 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 930 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

गेल्या 24 तासात भारतात 43 हजार 733 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 930 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 47 हजार 240 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

संबंधित बातम्या : 

रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या नावाखाली फसवणूक, 60 लाख रुपये जप्त, 6 जणांना बेड्या, मुंबई पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

पुण्याच्या ‘या’ भागातील 81 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज; सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

लसीकरणात महाराष्ट्राची रेकॉर्डब्रेक कामगिरी सुरुच, दिवसभरात आठ लाख नागरिकांचे लसीकरण

(Inter state bus service resumes in Maharashtra)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.