VIDEO | धबधब्याखाली आडोसा, 11 जणांना जलसमाधी देणाऱ्या अमरावती बोट दुर्घटनेपूर्वीचा व्हिडीओ समोर

अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीत मंगळवारी (14 सप्टेंबर 2021) सकाळी दहा वाजताच्या सुमारास बोट दुर्घटना घडली होती. श्री क्षेत्र झुंज येथे एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले होते.

VIDEO | धबधब्याखाली आडोसा, 11 जणांना जलसमाधी देणाऱ्या अमरावती बोट दुर्घटनेपूर्वीचा व्हिडीओ समोर
अमरावती बोट दुर्घटना
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 1:32 PM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदी बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. बोट उलटल्याने दोन दिवसांपूर्वी वर्धा नदीपात्रात एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले होते. या दुर्घटनेआधीचा व्हिडीओ आता समोर आला आहे. धबधब्याखाली बोटीने आडोसा घेतल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नेमकं काय घडलं होतं?

अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीत मंगळवारी (14 सप्टेंबर 2021) सकाळी दहा वाजताच्या सुमारास बोट दुर्घटना घडली होती. श्री क्षेत्र झुंज येथे एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले होते. 11 जण दशक्रिया विधीसाठी आले होते. दशक्रिया विधी आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व जण फिरायला गेले असताना ही दुर्घटना घडली होती. यामध्ये बोटीतील सर्वांनाच जलसमाधी मिळाली.

नदीपात्रात बचावकार्य

त्याच दिवशी तिघा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, तर दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर आणखी 7 मृतदेह शोधून काढण्यात आले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दोन दिवस शोध मोहीम राबवल्यानंतर 11 प्रवाशांपैकी 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर एकाचा शोध अजूनही सुरु आहे.

पाहा दुर्घटनेपूर्वीचा व्हिडीओ

दशक्रिया विधीनंतर कुटुंबीयांचा विहार

एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून बोटीने जात होते.

अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश होता. पहिल्या दिवशी तिघांचे मृतदेह हाती लागले होते, यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश होता.

अपघातग्रस्तांची नावे

1. अश्विनी खंडारे, रा. तारासावगा 2. वृषाली वाघमारे, रा. तारासावंगा 3. अतुल वाघमारे, रा. तारा सावंगा 4. निशा मटरे, रा. गाडेगाव 5. अदिती खंडारे, रा. तारा सावंगा 6. मोहिनी खंडारे, रा. तारा सावंगा 7. पियुष मटरे, रा. गाडेगाव 8. पूनम शिवणकर, रा. तिवसाघाट 9. नारायण मटरे, वय 45 वर्ष, रा. गाडेगाव 10. वांशिका शिवणकर, वय 2 वर्ष, रा. तिवसाघाट 11. किरण खंडारे, वय 28 वर्ष, रा. लोणी

संबंधित बातम्या :

अमरावतीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

नंदूरबारमध्ये सहलीला आलेल्या 13 पर्यटकांची बोट उलटली, तिघांचा मृत्यू, तर 4 जण बेपत्ता

बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना, 100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, अनेक जण बेपत्ता

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.