नांदेडमध्ये पावसाने हाहाकार, हजारो शेतकऱ्यांचं नुकसान, खा. चिखलीकर बळीराजाच्या बांधावर, लगोलग मदत देण्याचा शब्द

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गेल्या दोन दिवसापासून नायगाव मुखेड बिलोली आणि देगलूर तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या आहेत.

नांदेडमध्ये पावसाने हाहाकार, हजारो शेतकऱ्यांचं नुकसान, खा. चिखलीकर बळीराजाच्या बांधावर, लगोलग मदत देण्याचा शब्द
प्रतापराव पाटील चिखलीकर शेतकऱ्यांच्या बांधावर
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 8:39 AM

नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गेल्या दोन दिवसापासून नायगाव मुखेड बिलोली आणि देगलूर तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या आहेत. नागरिकांना धीर देण्यासाठी खासदार चिकलीकरांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला तर बळीराजाच्या बांधावर जाऊन त्यांनी हितगूज केले.

खा. चिखलीकर शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांना दिला धीर

नांदेड जिल्ह्यात  झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला . गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने अन्य भागातही पाणी तुंबले आहे. नायगाव, मुखेड, बिलोली, देगलूर ,धर्माबाद ,उमरी, भोकर, मुदखेड, अर्धापूर आणि नांदेड या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरले होते . पावसाचे पाणी शेतात साचल्यामुळे पिके पाण्याखाली गेली त्यामुळे खरीप हंगामातील नगदी पिके संकटात सापडली आहेत. अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गेल्या दोन दिवसापासून विविध भागात झंझावाती दौरे केले आहेत.

लवकरात लवकर मदत देतो, चिखलीकरांचा शेतकऱ्यांना शब्द

नायगाव तालुक्यातील मांजरम, मुखेड कवठा आणि बारूळ, बिलोली तालुक्यातील लोहगाव ,गागलेगाव, आराळी,  कुंभारगाव ,बेळकोणी, कासराळी , लघुळ आणि सगरोळी तर देगलूर तालुक्यातील शेवाळा, शेळगाव, तमलुर ,मेदनकल्लूर ,सांगवी, हनुमान हिप्पर्गा या गावांना भेटी दिल्या. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी त्यांनी वैयक्तिक संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठीचा धीर दिला .

तत्काळ पंचनामे करा, चिखलीकरांचे प्रशासकिय यंत्रणांना आदेश

प्रशासनाने अतिवृष्टीग्रस्त आणि नुकसान ग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे तात्काळ करावेत असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रशासकीय यंत्रणेला निर्देशित केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्‍वास देत सरकारकडून आपणास जास्तीत जास्त मावेजा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु असा विश्वासही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या, मदतीचा शब्द दिला

अनेक गावात झालेल्या घरांच्या पडझडीचे पाहणी करून घरपडी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी अनेक ग्रामस्थांनी सांगितले . पुराच्या पाण्यात वाहून जाऊन ज्यांचा मृत्यू झाला त्या मृतांच्या वारसांना शासन नियमानुसार आर्थिक मदत मिळवून देऊ असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी सांगितले.

(Maharashtra Nanded MP PratapRao Patil Chikhalikar Visited Rain Affected Village)

हे ही वाचा :

पावसाचा रौद्रावतार, गेवराईतील तीन तलाव फुटले, नांदेडमध्येही शेतकऱ्यांची दैना, अशोक चव्हाण शेतकऱ्यांच्या बांधावर

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.