राणेंच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी सरकारी अधिकारी उपस्थित राहणार नाहीत?, शिवसेनेची खेळी काय?; वाचा सविस्तर

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंच्या रत्नागिरी-सिंधुदूर्ग दौऱ्या आगोदरच राजकीय डावपेचांना सुरुवात झाली आहे. जन आर्शिवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेवर कडाडणाऱ्या नारायण राणेंना कोकणात काटशह देण्यासाठी शिवसेना आता मैदानात उतरली आहे. (narayan rane)

राणेंच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी सरकारी अधिकारी उपस्थित राहणार नाहीत?, शिवसेनेची खेळी काय?; वाचा सविस्तर
narayan rane

रत्नागिरी: केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंच्या रत्नागिरी-सिंधुदूर्ग दौऱ्या आगोदरच राजकीय डावपेचांना सुरुवात झाली आहे. जन आर्शिवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेवर कडाडणाऱ्या नारायण राणेंना कोकणात काटशह देण्यासाठी शिवसेना आता मैदानात उतरली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे ज्या दिवशी रत्नागिरीत येतायत त्याच वेळी जिल्हा नियोजनची बैठक घेण्यात आली आहे. राणेंच्या दौऱ्यात सरकारी बाबू सहभागी होणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठीच शिवसेनेने जिल्हा नियोजनाच्या बैठकीची खेळी केली आहे. (narayan rane’s jan ashirwad rally will reach in konkani 23rd august)

नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ते कोकणाचा पहिल्यांदाच दौरा करत आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्यात राणे आपली ताकद दाखवणार आहेत. पण राणेंच्या या दौऱ्याला आणखी तीन ते चार दिवस आधीच शिवसेने राजकीय डावपेचाला सुरुवात केली आहे. यापूर्वी चिपळूणात आलेल्या पुराच्या वेळी राणेंच्या पहाणी दौऱ्यात जिल्हाधिकारी हजर नसल्याने राणेंची आगपाखड झाली होती. त्यावेळी त्यांनी आपला राग फोनवरून व्यक्त केला होता.

सेना म्हणते, योगायोग

या साऱ्या प्रकरणानंतर आता राणे भाजपची जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात येते. कोकण हा सेनेचा बालेकिल्ला. पण या बालेकिल्यात म्हणजे रत्नागिरीमध्ये राणे ज्या दिवशी येणार त्याच दिवशी जिल्हा नियोजनाची बैठक लावण्यात आली आहे. राणे 23 आणि 24 ऑगस्टला रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. त्याचवेळी ही बैठक होत आहे. 24 ऑगस्टला सकाळी 11 वाजता पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनची बैठक होणार आहे. मात्र, राणेंचे आगमन आणि त्याचवेळी जिल्हा नियोजनची होत असलेली बैठक हा निव्वळ योगायोग असल्याचं मत शिवसेना नेते व्यक्त करत आहेत.

24 ऑगस्टला बैठक

जिल्हा नियोजनच्या बैठकीमुळे राणेंच्या दौऱ्याला अधिकारी वर्ग उपस्थित राहू नये यासाठी शिवसेनेने राजकीय खेळी खेळलीय. राणेंच्या दौऱ्याआधी 24 ऑगस्टला जिल्हा नियोजन बैठकीचा निर्णय झाला, असं शिवसेना नेते सांगतायत. या मागे शिवसेनेची नारायण राणेंना कोंडीत पकडण्यासाठीची खेळी सुद्धा असू शकते, असं राजकीय विश्लेषक किशोर मोरे यांनी सांगितलं.

राणे शक्तीप्रदर्शन करणार?

कोकणात सेनेची ताकद आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून राणे शक्तीप्रदर्शन करतील. या दरम्यान राणे जिल्हाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवू शकतात. पण सरकारी अधिकाऱ्यांना या दौऱ्यात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठीच शिवसेनेची खेळी नक्कीच राजकीय घडामोडीना वेगळं वळण देणारी ठरणारी आहे, असं राजकीय जाणकार सांगतात. (narayan rane’s jan ashirwad rally will reach in konkani 23rd august)

 

संबंधित बातम्या:

तर एकनाथ शिंदेंना आमच्यात घेऊ, ते शिवसेनेत कंटाळलेत, नारायण राणेंचा मोठा दावा

शिळ्या कढीला ऊत आणू नका, आमच्यासाठी तो विषय संपला, राज ठाकरेंच्या प्रकरणाचा अजित पवारांकडून THE END

स्टंटबाजी कशाला करताय, आमचीही तीच भूमिका, पडळकरांच्या बैलगाडा शर्यतीनंतर अजित पवारांचं मोठं भाष्य

(narayan rane’s jan ashirwad rally will reach in konkani 23rd august)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI