मायबाप सरकार, आम्हाला कायपण नको फक्त रस्ता चांगला करुन द्या, सामाजिक कार्यकर्त्याचं स्वत:च्या रक्ताने थेट मुख्यमंत्र्याना पत्र

पंढरपूर-तिर्हे- सोलापूर या मार्गावरून प्रवास करणारे अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार नागटिळक यांनी स्वतःच्या रक्ताने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून' मायबाप सरकार.आम्हाला कायपण नको फक्त चांगला रस्ता द्या अशी तळमळीची विनंती केली आहे.

मायबाप सरकार, आम्हाला कायपण नको फक्त रस्ता चांगला करुन द्या, सामाजिक कार्यकर्त्याचं  स्वत:च्या रक्ताने थेट मुख्यमंत्र्याना पत्र
सोलापूर रस्ता प्रश्न


सोलापूर: पंढरपूर-तिर्हे- सोलापूर या प्रमुख जिल्हा मार्गाची झालेली अतिशय दयनीय अवस्था कित्येक वर्षांपासून कायम आहे. रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. पंढरपूर-तिर्हे- सोलापूर या मार्गावरून प्रवास करणारे अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार नागटिळक यांनी स्वतःच्या रक्ताने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून’ मायबाप सरकार.आम्हाला कायपण नको फक्त चांगला रस्ता द्या अशी तळमळीची विनंती केली आहे.

तात्पुरती मलमपट्टी

प्रत्येकवेळी केवळ मोठमोठे खड्डे बुजवून मलमपट्टी केली जात असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिसरातील नागरिकांकडून कायमचा सिमेंटचा रस्ता करण्याची मागणी केली जात आहे. पंढरपूर ते कामती अळा जवळपास 34 किमीच्या मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली असल्याने या मार्गावरील गावोगावचे पदाधिकारी, नागरिक, वाहनधारक रस्तासाठी पाठपुरावा करूनही शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने हतबल झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी रक्तानं पत्र

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे लक्ष वेधण्यासाठी थेट स्वतः च्या रक्ताने लिहलेले पत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याना देण्यात आले आहे. पंढरपूर-तिर्हे- सोलापूर या रस्त्याचं डांबरीकरण करा. या रस्त्यासाठी निधी अशी मागणी विजयकुमार नागटिळक यांनी केली आहे. पंढरपूर-तिर्हे- सोलापूर रस्त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र, कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. यामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. या रस्त्यासाठी निधी दिला जावा, अशी मागणी नागटिळक यांनी केली आहे.

दुसऱ्या ठिकाणची रस्त्याची काम सुरु आहेत. आमच्या रस्त्याच्या कामासाठी निधीचं कारण दिलं जात आहे. मात्र, आमचं आयुष्य संपत आलं तरी रस्त्याचं डांबरीकरण झालेलं नाही. मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घ्यावा, या रस्त्याच्या कामासाठी निधी द्यावा, अशी मगाणी विजयकुमार नागटिळक यांनी केली आहे.

सोलापूर अक्कलकोट मार्गावरील प्रवाशांना

वर्षानुवर्षे रस्त्यांची दुरावस्था सहन करणाऱ्या सोलापूर अक्कलकोट मार्गावरील प्रवाशांना नवा चौपदरी रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच टोल भरावा लागत आहे. सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळे 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरातच कुंभारी आणि वळसंग येथे दोन टोल नाके सुरू झाले आहेत. सहा वर्षापूर्वी धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते चौपदरी करण्याचा निर्णय झाला, यासाठी कामही तातडीने घेण्यात आले. अवघ्या अडीच वर्षात सोलापूर ते अक्कलकोट हा चौपदरी सिमेंट रस्ता पूर्णत्वाच्या मार्गावर आला आहे. रस्त्याच्या कामात प्रगती होत असली तरी उड्डाणपूल, वळण रस्ते ,जोड रस्ते ,छोटे-मोठे पूल, भुयारी मार्ग ही कामे अद्याप अपूर्ण आहेत. रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही आणि टोलवसुलीची इतकी घाई का असा प्रश्न यानिमित्ताने प्रवाशांकडून विचारला जात आहे.

इतर बातम्या:

औरंगाबादकरांनो, प्लॉट खरेदीवेळी सावध रहा, तुकडेबंदी झुगारून बाँडपेपरवर मालमत्ता घ्याल तर फसवणूक होईल!!

परवा एका एकराला 18 कोटी दिले, आता लोकं भेटून सांगतात, दादा तेवढा रस्ता आमच्या शेतातून न्या की…! : अजित पवार

Pandharpur Tirhe Solapur road issue Social Activist Vijaykumar Nagtilak wrote letter to Uddhav Thackeray

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI