महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग; वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी नागरिक शेजारच्या राज्यात

Petrol price | इंधनाच्या या वाढलेल्या दरामुळे धर्माबादकर चांगलेच त्रस्त झालेत. त्यामुळे अनेक जण इंधन भरण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात जात आहेत. धर्माबाद शहराला सोलापूर इथल्या डेपोतून इंधन पुरवठा होतो.

महाराष्ट्रातील 'या' शहरात पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग; वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी नागरिक शेजारच्या राज्यात
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 9:54 AM

नांदेड: तेलंगणा सीमेवर असलेल्या धर्माबाद शहरात पेट्रोल 118 रुपये लिटर वर पोहोचले आहे. तर याच धर्माबाद शहरात डिझेल 108 रुपये लिटर दराने विकले जात आहे. इंधनाच्या या वाढलेल्या दरामुळे धर्माबादकर चांगलेच त्रस्त झालेत. त्यामुळे अनेक जण इंधन भरण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यात जात आहेत. धर्माबाद शहराला सोलापूर इथल्या डेपोतून इंधन पुरवठा होतो. हे अंतर अधिकचे असल्याने वाहतूक खर्च वाढल्याने इथे इंधनाचा दर कायमच अधिक असतो.

पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव?

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. ऑक्टोबर महिना संपेपर्यंत पेट्रोलने प्रतिलीटर 115 तर डिझेलने 110 रुपये प्रतिलीटरची पातळी गाठली आहे. त्यामुळे लवकर इंधनाचे दर 120 रुपयांच्या पलीकडे जातील, असा अंदाज आहे. यामुळे ऐन दिवाळीत महागाईचा भडका उडण्याची शक्यता असून त्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत पडले आहेत.

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली आहे. त्यानुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.50 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 106.62 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.34 आणि 98.42 रुपये इतका आहे.

देशातील सहा शहरांमध्ये पेट्रोल 120 रुपयांच्या पलीकडे

बालाघाटमध्ये पेट्रोलचा दर 120.06 रुपयांवर पोहोचला आहे, तर डिझेल 109.32 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. भोपाळमध्ये पेट्रोल 117.71 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 107.13 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. स्थानिक करांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तफावत आहे. मध्य प्रदेशातील पन्ना, सतना, रीवा, शहडोल, छिंदवाडा आणि बालाघाटमध्ये पेट्रोलने आता 120 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

राजस्थानच्या गंगानगर आणि हनुमानगडमध्येही इंधनाने ही पातळी गाठली आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 121.52 रुपये आणि डिझेल 112.44 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. याठिकाणी देशातील सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. 28 सप्टेंबरपासून पेट्रोलचे दर 25 वेळा वाढवण्यात आले आहेत. तेव्हापासून पेट्रोल 8.15 रुपयांनी महागले आहे. त्याचवेळी 24 सप्टेंबरपासून आतापर्यंत 28 वेळा डिझेलच्या दरात वाढ झाली असून त्याचा दर 9.45 रुपयांनी वाढला आहे.

संबंधित बातम्या:

LPG Price: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारकडून महागाईचा झटका; गॅस 265 रुपयांनी महागला

पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने मोदी सरकारची ‘दिवाळी’; सरकारी तिजोरीत 1.71 लाख कोटींची भर

देशातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 120 रुपये तर डिझेल 110 रुपयांपलीकडे; जाणून घ्या कारण

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.