पुणे नाशिकमध्ये गोंधळ, प्रश्नपत्रिका देण्यास उशीर का झाला? राजेश टोपेंकडून स्पष्टीकरण

पुण्याच्या केंद्रावर ती पाच ते दहा मिनिट उशिरा प्रश्नपत्रिका मिळण्याचे कारण हे प्रश्नपत्रिकेच्या बॉक्सवरील डिजीटल लॉक वेळेत न उघडल्यामुळे झाल्याचंही स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

पुणे नाशिकमध्ये गोंधळ, प्रश्नपत्रिका देण्यास उशीर का झाला? राजेश टोपेंकडून स्पष्टीकरण
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 12:10 PM

जालना : आरोग्य विभागाच्या नाशिक आणि पुणे येथील गोंधळावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले. पुणे येथे विद्यार्थ्यांना दहा मिनिटे उशीर झालेला वेळ भरून काढण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री यांनी दिली. पुण्याच्या केंद्रावर ती पाच ते दहा मिनिट उशिरा प्रश्नपत्रिका मिळण्याचे कारण हे प्रश्नपत्रिकेच्या बॉक्सवरील डिजीटल लॉक वेळेत न उघडल्यामुळे झाल्याचंही स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देणार तर न्यासा कंपनीवर कारवाई

आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजोग कदम आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्रावर झालेल्या गोंधळ प्रकरणी खुलासा केला आहे. न्यासा कंपनीला परीक्षेचे काम दिले आहे त्या कंपनीवर गोंधळाबद्दल कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार असल्याचं संजोग कदम यांनी म्हटलंय. परीक्षेच्या वेळेनंतर 1 तासांनी आरोग्य विभागाचे अधिकारी परीक्षा केंद्रावर पोहचलेत. विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे.

पुणे आणि नाशिकमध्ये गोंधळ

पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील गिरणारे परीक्षा केंद्रावर देखील गोंधळ पाहायला मिळाला. पेपर प्रक्रिया राबवणाऱ्या व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. विद्यार्थी संख्ंयेच्या कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा दावा देखील विद्यार्थ्यांनी केला.

पुण्यात परीक्षेला सुरुवात

दरम्यान, पुण्यात 11.30 वाजता आरोग्य विभागाची परीक्षा संबधित परीक्षा केंद्रावर सुरु झाली असून वरिष्ठांना घडलेल्या प्रकाराची माहिती कळवणार असल्याचं संजोग कदम यांनी म्हटलंय.

विद्यार्थी संतप्त

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकार, आरोग्य विभागाविरोधात संताप केला आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दोन दोन वेळा परीक्षा द्यायला यावं लागतंय. सिंधुदुर्ग, बीड मधून विद्यार्थी पुण्यात परीक्षेसाठी दाखल झाले होते. विद्यार्थ्यांनी तीन तीन हजार रुपये खर्चून परीक्षेसाठी आलो असल्याचं म्हटलंय.

इतर बातम्या:

सावळा गोंधळ सुरुचं, आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या नियोजनाचा बोजवारा, पुणे नाशिकमध्ये विद्यार्थी संतप्त

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील चिखलफेक थांबवायची असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ द्या’, संजय राऊतांचं मोदी, शाहांना आवाहन

Rajesh Tope said Health department exam extra time will given to students at exam centres in Pune and Nashik

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.