मेंढपाळाच्या मुलाची कमाल, थेट लघुग्रहाचा शोध लावला

विनायक दोलताडे हे सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी माण तालुक्यातील माळवाडी गावातील आहेत. त्यांना विद्यार्थी दशेत असतानापासूनच अवकाश निरीक्षणाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अवकाशातील ग्रह शोध बारकाव्याने निरीक्षण सुरु ठेवले.

मेंढपाळाच्या मुलाची कमाल, थेट लघुग्रहाचा शोध लावला
Vinayak Doltode discovered Asteroid

सातारा : अमेरिकन अवकाश संशोधन संस्था (NASA) ने सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेत साताऱ्यातील विनायक दोलताडे यांनी एका लघुग्रहाचा शोध लावून गगन भरारी घेतली आहे.

विनायक दोलताडे हे सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी माण तालुक्यातील माळवाडी गावातील आहेत. त्यांना विद्यार्थी दशेत असतानापासूनच अवकाश निरीक्षणाची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अवकाशातील ग्रह शोध बारकाव्याने निरीक्षण सुरु ठेवले.

अमेरिकन अवकाश संशोधन संस्था (नासा) ने सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये विनायक दोलताडे यांना अवकाशातील एका लघुग्रहाचा शोध लावण्यात त्यांना यश मिळविले आहे. नासा, पॅन स्टार्स, कॅटालिना स्काय सर्व्हे आणि हर्डिन सिमन्स युनिव्हर्सिटी टेक्सास यांच्याकडून 1 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये “खगोल भूगोल वेद आणि विज्ञान” या त्यांच्या टीमकडून एका नवीन लघु ग्रहाचा शोध नोंदवण्यात आला.

या टीममध्ये विनायक दोलताडे यांच्यासह आनंद कांबळे, संकेत दळवी, वैभव सावंत, मनिष जाधव, गौरव डाहूले यांचा समावेश आहे. या टीमने प्राथमिक अवस्थेत शोधलेल्या या ग्रहाला (P11K6CL) सध्या KBV0001 असे नाव देण्यात आले असून त्याची नोंद नासाकडे करण्यात आली आहे. तीन ते पाच वर्षे त्याच्या स्थितीचे व हालचालींचे निरिक्षण घेऊन. त्याचा समावेश नासाच्या खगोलीय घटकांच्या यादीमध्ये करण्यात येणार आहे. या टीमचे प्रमुख विनायक हे एका मेंढपाळाचे सुपूत्र असून त्यांचे प्राथमिक शिक्षण माण तालुक्यातील रांजणी येथे तर माध्यमिक शिक्षण सिद्धनाथ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज म्हसवड येथील माळवाडी येथे झाले आहे.

एका सर्वसामान्य कुटुंबातून जन्मलेल्या विनायकने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे आणि त्याच्या टीमचे विविध क्षेत्रातुन कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या :

हे काय भलतेच.. आळूच्या झाडाला आले फूल? औरंगाबादेत निसर्गाची किमया पाहण्यासाठी उत्सुकांच्या रांगा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI