सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता 48 तासात रद्द; नारायण राणे अमित शाह भेटीनंतर हे घडलं, मनसेच्या नेत्याचा आरोप

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास नॅशनल मेडिकल कौन्सिलने दिलेली परवानगी अवघ्या 48 तासात रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला केंद्राच्या मान्यतेसाठी जुलैमध्ये केंद्रीय समितीने पाहणी दौरा केला होता.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता 48 तासात रद्द; नारायण राणे अमित शाह भेटीनंतर हे घडलं, मनसेच्या नेत्याचा आरोप
सिंधुदुर्ग वैद्यकीय रुग्णालय
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 7:37 PM

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास नॅशनल मेडिकल कौन्सिलने दिलेली परवानगी अवघ्या 48 तासात रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला केंद्राच्या मान्यतेसाठी जुलैमध्ये केंद्रीय समितीने पाहणी दौरा केला होता. त्यानंतर नुकतीच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली होती. खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांनी तशी घोषणा केली होती.मात्र,परवानगी दिल्यानंतर अवघ्या 48 तासात पुन्हा प्रस्तावात त्रुटी काढून त्यांच्या पूर्ततेसाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

श्रेयवादाच्या लढाईत महाविद्यालयाचं भविष्य अधांतरी

आधी मंजूर झालेल्या प्रस्तावात नंतर कशा त्रुटी निर्माण झाल्या असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे महाविद्यालयाचे भवितव्य पुन्हा अधांतरी झाले आहे.

नारायण राणे अमित शाह भेटीनंतर मान्यता रद्द, मनसेचा आरोप

केंद्रीय मंञी नारायण राणे यांनी गृहमंञी अमित शहा यांची काल भेट घेतल्यानंतरचं ही परवानगी रद्द करण्यात आली असल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. जिल्ह्याचा विकास हे केंद्र आणि राज्य सरकारमधील श्रेयवादामुळे खुंटतोय, असं उपरकर म्हणाले आहेत. जसा प्रकार चिपी विमानतळाच्या श्रेयवादाचा झाला तसाच हा प्रकार असून श्रेयावादामुळे सर्व प्रकल्प दोन्ही सरकार अडकवून ठेवत असल्याचा आरोप देखील परशुराम उपरकर यांनी केला आहे.

विनायक राऊतांचा राणेंना टोला

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता दिल्याची घोषणा करताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. यंदापासून 100 विद्यार्थ्यांची एमबीबीएसची बॅच सुरू होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हावासीयांसाठी ही आनंदाची बाब असून त्यामुळे जिल्हा वैद्यकीय क्षेत्रात स्वावलंबी बनणार आहे.अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला आहे मात्र जे मंत्री, मुख्यमंत्री झाले त्यांनी स्वतःची खासगी मेडिकल कॉलेज काढली”, असा टोला त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी 30 वर्षांची प्रतीक्षा

गेली पंचवीस-तीस वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत होता. काहींनी लोकांसाठी नाही तर स्वतः साठी विद्यालय मंजूर करून घेतले होते, असा टोलाही विनायक राऊत यांनी नारायण राणेना लगावला होता. एनएमसीकडून देण्यात आलेली मान्यता रद्द करण्यात आल्यानं सिंधुदुर्गवासियांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतीक्षा वाढली आहे.

त्रुटींची पूर्तता करुन परवानगी मिळवू: उदय सामंत

17 तारखेला नशनल मेडिकल कॉलेज ने सिंधुदूर्ग मेडिकल महाविद्यालयाला परवानगी दिली असल्याचे वेबसाईटवर आले होते. त्यांच्याशी बेसिक चर्चाही झाली होती. पण 21 तारखेला त्यांच्याकडून जे पत्र आलं त्यात तीन त्रुटी दाखवल्या आहेत. त्या त्रुटींवर कार्यवाही करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. मला वाटत की या त्रुटींवर कार्यवाही केल्याचा अहवाल दोन दिवसांत पाठवू आणि त्यानंतर आम्हाला परवानगी मिळेल. नारायण राणे आणि अमित शाह भेटीबद्दल मला कल्पना नाही. पण 17 तारखेला परवानगी मिळते आणि 21 तारखेला त्रुटी निघातात हे कुणाच्याही आकलनशक्तीच्या बाहेरचे आहे. कुणाच्या विरोधाने जर मेडिकल कॉलेज थांबत असेल तर ते दुर्दैव आहे. पण मला वाटते की अशा चांगल्या उपक्रमाला कुणी विरोध करणार नाही, असं उदय सामंत म्हणाले.

त्रुटी मध्ये फर्निचर लायब्ररी विषय आहे. स्टाफ कुठे रहाणार हा विषय आहे. आम्ही 2 ते 3 दिवसांत त्यांना लेखी देऊ आणि जिल्ह्यासाठी कॉलेज किती महत्वाचे आहे यापूर्वीच सांगितले आहे. कुणी विरोध करणार नाही उलट सहकार्यच करतील. कुणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर ते आमचं दुर्दैव नाहीतर सिंधुदुर्ग वासियांचे दुर्दैव आहे. या सगळ्या प्रकरणाकडे सकारात्मक नजरेने पाहतो. त्यांच्या नजरचुकीने 17 तारखेला त्रुटी काढणे राहून गेले असावे. नंतर त्यांना ते कळलं असावे. त्यांना पूर्ण परिपक्व कॉलेज त्यांना सिधुदुर्गात करायचे असेल म्हणून त्यांनी काही त्रुटी काढल्या असतील. पण त्या त्रुटी दूर करून परवानगी मिळवू, असंही उदय सामंत म्हणाले.

इतर बातम्या:

Sindhudurg Medical College permission cancelled within 48 hours MNS leader accused on meeting of Narayan Rane and Amit Shah

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.