अकोला जि.प.च्या 14 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी निवडणूक जाहीर,पोटनिवडणूकीची आचार संहिता लागू….!

राज्यातील पाच जिल्हा परिषदेतील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याने राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) येथे आचार संहितेसोबत निवडणूक कार्यक्रमाची आज घोषणा केली.

अकोला जि.प.च्या 14 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी निवडणूक जाहीर,पोटनिवडणूकीची आचार संहिता लागू....!
अकोला जिल्हा परिषद

अकोला : राज्यातील पाच जिल्हा परिषदेतील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याने राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) येथे आचार संहितेसोबत निवडणूक कार्यक्रमाची आज घोषणा केली. यात राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या 70 जागांबरोबर 33 पंचायत समितीच्या 130 निर्वाचक गणांसाठी निवडणूक घोषित करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गासह (OBC Reservation) पन्नास टक्के पेक्षा अधिक आरक्षण झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण रद्द केल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत ही पोटनिवडणूक होत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. (State Election Commission declared 14 seats of Z.P. and 28 seats of Panchayat Samiti of Akola know election Programme details)

आज पासून या निवडणूकीची आचार संहिता घोषित करण्यात आली आहे. मंगळवार 29 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करतील.तर संकेतस्थळावर भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिकार्‍यांनी स्वीकारण्याचा कालावधी हा 29 जून ते 5 जुलै हा अशेल. सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत अर्ज दाखल करता येतील रविवार, 4 जुलै रोजी नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार नाहीत.

नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय 6 जुलै रोजी घेण्यात येईल. वैध उमेदवारांची घोषणा देखील त्याच दिवशी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 12 जुलै पर्यंत मुदत राहील. निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी व निशाणी ही 12 जुलै रोजी दुपारी 3.30 वा. प्रसिध्द केली जाईल. जिथे अपिल आहे तिथे 14 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजता उमेदवाराची यादी व निशाणी वाटप निश्चित होईल. 19 जुलै रोजी मतदान आणि 20 जुलै रोजी मतमोजणी करण्यात येईल. 23 जुलै रोजी निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिध्द करण्यात येणार आहेत. .

अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद मतदार संघ….

अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांमध्ये तेल्हारा तालुक्यातील दानापूर, अडगांव बु., तळेगाव बु., अकोट तालुक्यातील अकोलखेडा, कुटासा, मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपूरी, बपोरी, अकोला तालुक्यातील घुसर, कुरणखेड, कानशिवनी, बाळापूर तालुक्यातील अंदुरा, देगांव, बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा, तर पातूर तालुक्यातील शिर्ला या जिल्हा परिषद गटांसाठी निवडणूक होणार आहे.

28 पंचायत समिती गण

अकोला जिल्ह्यात पंचायत समितीमधील हिवरखेड, अडगाव बु., वाडी अदमपूर, भांबेरी, प्रिंप्री खु., अकोलखेड, मुंडगांव, रौंदळा, लाखपुरी, ब्रम्ही खु., माना, कानडी, दहिहंडा,घुसर, पळसो, कुरणखेड, चिखलगांव, निमकर्दा, पारस भाग-1, देगांव, वाडेगाव भाग-2, दगडपारवा, मोऱ्हळ, महान, पुनोती-बु, शिर्ला, खानापूर व आलेगांव या 28 निर्वाचक गणांकरिता पोटनिवडणूक घेण्‍यात येणार आहे.

संबंधित बातम्या:

वाशिम जिल्हा परिषदेचा अखेर बिगूल वाजला, अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची माहिती फक्त एका क्लिकवर

सुप्रीम कोर्टानं OBC आरक्षण रद्द केलेल्या 5 जिल्हा परिषदा, 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, संपूर्ण निवडणूक कार्यक्रम एका क्लिकवर

(State Election Commission declared 14 seats of Z.P. and 28 seats of Panchayat Samiti of Akola know election Programme details)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI