Nanded Murder : नांदेडमध्ये किराणा आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

मयत चंद्रकांत पवार हा 29 एप्रिल रोजी किराणा सामान आणण्यासाठी घरातून निघून गेला होता. मात्र बराच वेळ उलटून गेला तरी तो घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी दुकानात, आसपासच्या परिसरात त्याची शोधाशोध सुरु केली. पण त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. त्यानंतर चार दिवसांनी थेट त्याचा मृतदेहच आढळून आला.

Nanded Murder : नांदेडमध्ये किराणा आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला
नांदेडमध्ये किराणा आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 3:37 PM

नांदेड : किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडलेल्या 19 वर्षीय युवकाचा आमदुरा शिवारात चार दिवसांनी मृतदेह (Deadbody) आढळल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे. चंद्रकांत उर्फ चांदू पवार असे हत्या (Murder) झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मुदखेड पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. (The body of a youth who went missing in Nanded was found in a farm four days later)

दुकानाता सामान आणायला गेला तो परतलाच नाही

मयत चंद्रकांत पवार हा 29 एप्रिल रोजी किराणा सामान आणण्यासाठी घरातून निघून गेला होता. मात्र बराच वेळ उलटून गेला तरी तो घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी दुकानात, आसपासच्या परिसरात त्याची शोधाशोध सुरु केली. पण त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. त्यानंतर चार दिवसांनी थेट त्याचा मृतदेहच आढळून आला. 2 मे रोजी शेतातील गवतामध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मुदखेड पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीनंतर चंद्रकांत पवार यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी वडील शंकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाची हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली याचा पोलीस निरीक्षक महेश शर्मा अधिक तपास करत आहेत. (The body of a youth who went missing in Nanded was found in a farm four days later)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.