VIDEO: नदीवरचा पूल खचल्याने ट्रक अडकला; शेगाव-अकोट मार्गावरील वाहतूक ठप्प

कंत्राटदाराने माती आणि मुरूम टाकून या मार्गावरून वाहतूक सुरू केली होती. मात्र, आज सकाळीच पुन्हा याच ठिकाणी मालवाहू ट्रक फसला. | Truck Stuck on flyover

VIDEO: नदीवरचा पूल खचल्याने ट्रक अडकला; शेगाव-अकोट मार्गावरील वाहतूक ठप्प


अकोला: दोन दिवसांपूर्वी अकोट-शेगाव मार्गावरील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या लोहारा गावानजीक मन नदीवरील पुलाचा काही भाग खचला होता. शनिवारी या ठिकाणी संबंधित कंत्राटदाराने माती आणि मुरूम टाकून या मार्गावरून वाहतूक सुरू केली होती. मात्र, आज सकाळीच पुन्हा याच ठिकाणी मालवाहू ट्रक फसला. त्यामुळे सध्या अकोट- शेगाव या राज्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. (Truck stuck on flyover near Buldhana Shegaon akot highway Maharashtra)

हा पूल बराच जीर्ण झाला आहे. बाजूलाच नवीन पुलाचे बांधकाम सुरु असून कंत्राटदाराने जुन्या पुलाजवळ खोदकाम केल्यामुळे हा अपघात घडला होता. या घटनेला दोन दिवसाचा अवधी उलटला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.

(Truck stuck on flyover near Buldhana Shegaon akot highway Maharashtra)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI