आमच्या तयारीचा मित्रपक्षालाही फायदा होईल : रावसाहेब दानवे

सातारा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राज्यातील 48 मतदारसंघांचा आढावा सुरु आहे. भाजपचा सर्व जागांचा आढावा घेणं सुरु आहे. युती झाल्यास मित्रपक्षांसाठी जागा सोडणार असल्याचं दानवेंनी साताऱ्यातील कराडमध्ये बोलताना सांगितलं. आमच्या तयारीचा मित्रपक्षालाही फायदा होईल, असं ते म्हणाले. तयारीचा मित्रपक्षांना तर फायदा होईलच. शिवाय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणं हाच एकमेव उद्देश आहे. त्यामुळे …

आमच्या तयारीचा मित्रपक्षालाही फायदा होईल : रावसाहेब दानवे

सातारा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राज्यातील 48 मतदारसंघांचा आढावा सुरु आहे. भाजपचा सर्व जागांचा आढावा घेणं सुरु आहे. युती झाल्यास मित्रपक्षांसाठी जागा सोडणार असल्याचं दानवेंनी साताऱ्यातील कराडमध्ये बोलताना सांगितलं. आमच्या तयारीचा मित्रपक्षालाही फायदा होईल, असं ते म्हणाले.

तयारीचा मित्रपक्षांना तर फायदा होईलच. शिवाय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणं हाच एकमेव उद्देश आहे. त्यामुळे तयारी जोरात सुरु आहे, असं दानवेंनी सांगितलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर दानवे साताऱ्यात आले. तिथून पुढे ते पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी रवाना झाले.

तुमच्या जिल्ह्यातील यावेळचा खासदार कोण? सध्याचं चित्र पाहण्यासाठी क्लिक करा

लातूरमध्ये भाजपच्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाध्यक्ष अमित शाह म्हणाले होते, की ‘युती झाली तर ठिक नाही तर मित्रपक्षालाही धूळ चारु’. त्यामुळे भाजपने सर्व मतदारसंघांची जोरात तयारी सुरु केली आहे. युतीसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु असली तरी शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढण्याच्या दृष्टीनेही तयारी करत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा राज्यातील विविध भागात दौरा होत आहे. तर भाजपकडूनही विविध नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सर्व मतदारसंघांचा आढावा घेत राज्यभर दौरा करत आहेत. बुधवारी जालना, बारामती या मतदारसंघांचा दौरा केल्यानंतर ते सोलापूरला रवाना झाले. आता पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *