शेतकऱ्यांना सरकारचं पत्रं, तेवढे पैसे परत करा !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यातील जमा रक्कम परत करण्याचे निर्देश पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. (PM Kisan Samman Nidhi)

  • मोहम्मद हुसैन, टीव्ही 9 मराठी, पालघर
  • Published On - 13:08 PM, 22 Dec 2020
शेतकऱ्यांना सरकारचं पत्रं, तेवढे पैसे परत करा !

पालघर: नरेंद्र मोदी सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM-Kisan Samman Nidhi Scheme) शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यातील जमा रक्कम पुन्हा परत करण्याचे निर्देश पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत. पालघर जिल्ह्यातील 1773 शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.(Palghar Collector order to refund PM Kisan Samman Nidhi amount)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनच्या अंतर्गत अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यातील जमा रक्कम पुन्हा परत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार पालघर मधील 1773 अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यातील 4617 हप्त्यांतील 92 लाख 34 हजार रुपये परत करावी लागणार आहे.

पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार 239 शेतकऱ्यांनी 22 लाख 66 हजार इतकी रक्कम शासनास परत केली. तर, 1463 आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या 1 कोटी 38 लाख बावन्न हजार परत करण्याचे निर्देश होते. त्या नुसार 187 शेतकऱ्यांनी 17 लाख 96 हजार रुपये शासनास परत केले आहेत.

किसान सन्मान योजनेचा सातवा हप्ता 25 डिसेंबरला जमा होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील’ 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 डिसेंबर पासून वर्ग करणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता 11.17 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती यापूर्वी देण्यात आली होती.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) या योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत शेतक-यांना सहा हप्ते पाठवण्यात आले आहेत. गेल्या 23 महिन्यांत केंद्र सरकारने 11.17 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर 95 कोटी रुपयांहून अधिक मदत जमा केली आहे.

पीएम किसान सन्मान योजनेत केंद्र सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये वर्ग करते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो, तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. मात्र, यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्यांशी लिंक असणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या:

किसान सम्मान निधीचा सातवा हप्ता जारी, कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा

PM Kisan Yojna : अद्याप 7.5 कोटी शेतकर्‍यांना 2 हजार रुपये मिळाले नाहीत, पैसे हवे असल्यास करा हे काम

(Palghar Collector order to refund PM Kisan Samman Nidhi amount)