पालघरच्या कॉन्स्टेबलने सातासमुद्रापार तिरंगा फडकवला!

मोहम्मद हुसैन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर : मलेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत पालघरचे पोलीस कॉन्स्टेबल शंकर उथळे यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करत, मलेशियात तिरंगा फडकविला आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारे शंकर हे देशातील पहिले पोलीस कॉन्स्टेबल ठरले. शंकर हे विरार पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून पालघरमध्ये राहतात. शंकर यांनी ही स्पर्धा सोळा […]

पालघरच्या कॉन्स्टेबलने सातासमुद्रापार तिरंगा फडकवला!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मोहम्मद हुसैन खान, टीव्ही 9 मराठी, पालघर : मलेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत पालघरचे पोलीस कॉन्स्टेबल शंकर उथळे यांनी भारताचे प्रतिनिधीत्व करत, मलेशियात तिरंगा फडकविला आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारे शंकर हे देशातील पहिले पोलीस कॉन्स्टेबल ठरले. शंकर हे विरार पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून पालघरमध्ये राहतात. शंकर यांनी ही स्पर्धा सोळा तास आणि पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण केली. यामध्ये 3.8 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी धावणे अशा सलग टप्प्यांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली.

विशेष म्हणजे, मलेशिया येथे होणाऱ्या आर्यनमॅन स्पर्धेत पात्र होण्यासाठी शंकर उथळे यांनी 92 किलो वाढलेलं वजन कमी केलं आणि स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. वजन कमी करण्याच्या उद्देशाने शंकर हे गेल्या दोन वर्षांपासून धावणे, पोहणे, सायकलिंग करणे यांचा कसून सराव करत होते.

या स्पर्धेसाठी 3.8 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग व 42 किमी धावणे अशा सलग स्पर्धामधून खेळाडूंना जायचं असतं. तसेच, शंकर उथळे यांनी 180 किमी सायकलिंग 8 तास 19 मिनिटे 45 सेंकदात पूर्ण केली तर 3.8 किमी पोहणे 1 तास 46 मिनिटे 49 सेंकदात पूर्ण केली. त्याचप्रमाणे 42 किमी धावणे ही स्पर्धा 5 तास 42 मिनिटे 40 सेंकदात केलं. एकंदरीत ही संपूर्ण स्पर्धा 16 तास 15 मिनिटे 42 सेंकदात पूर्ण केली आहे. या स्पर्धेत देशविदेशातील एकूण दोन हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी केवळ दीडशे स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल उथळे यांच्या यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. वरिष्ठ, सहकारी त्यांचं अभिनंदन करुन, शुभेच्छा देत आहेत. पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी शंकर यांचे विशेष कौतुक केलं.

असंख्य स्पर्धांमध्ये सहभाग

पोलीस नाईक उथळे हे भारतासह पॅरिस आणि मलेशिया येथे पार पडलेल्या अनेक स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे.  2016-17 मध्ये पॅरिस देशामार्फत भारतामध्ये ‘अडऑक्स इंडिया रंडोननेउर’ या आयोजित सायकल स्पर्धेत 200 किमी अंतर 11 तास 1 मिनीट, वलसाड गुजरात येथील स्पर्धेत 300 किमी अंतर 38 तास 56 मिनिट, पुणे येथे झालेल्या सायकल स्पर्धेत 600 किमी अंतर 38 तास 56 मिनिट अशा स्पर्धा पूर्ण करून सुपर रेडोनियर हा किताब शंकर उथळे यांनी मिळवला होता. त्यामुळे शंकर उथळे  यांच्या खिलाडीवृत्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.