पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन जाते तर कोसेसरी गावकरी मात्र रस्त्यासाठी झगडताहेत; जीव मुठीत धरुन करायचा प्रवास…

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कोसेसरी (Kosesari) या गावाला जोडणारा रस्ता नसल्याने ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून लाकडाच्या आधारावरुन नदीतून प्रवास करावा लागतो आहे. नदीत जास्त पाणी असल्याने येथील ग्रामस्थांना लाकडी फळ्या आणि बांधलेली रस्सी यांचा आधार घेऊन नदी पात्र पार करावं लागते.

पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन जाते तर कोसेसरी गावकरी मात्र रस्त्यासाठी झगडताहेत; जीव मुठीत धरुन करायचा प्रवास...
कोसेसरीत जीव धोक्यात घालून प्रवास करणारे विद्यार्थी आणि नागरिकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 6:10 PM

पालघरः बुलेट ट्रेन (Bullet Train), मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग (Higway), वाढवण बंदर यासारखे केंद्र सरकारचे महत्वाचे प्रकल्प ज्या पालघरमधून जातात त्याच पालघरमध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कोसेसरी (Kosesari) या गावाला जोडणारा रस्ता नसल्याने ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून लाकडाच्या आधारावरुन नदीतून प्रवास करावा लागतो आहे. नदीत जास्त पाणी असल्याने येथील ग्रामस्थांना लाकडी फळ्या आणि बांधलेली रस्सी यांचा आधार घेऊन नदी पात्र पार करावं लागते.

गेली अनेक वर्ष हा दीडशे मीटरचा प्रवास येथील ग्रामस्थ जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत मात्र सरकार याकडे लक्ष देत नाही. येथील नदी पार करुनच येथील लोकांचे रोजचे व्यवहार केले जातात. यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून या नदीवर पूल करण्याची मागणी येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करत आहेत. मात्र या मागणीकडे ना सरकार लक्ष देते ना प्रशासन.

जीव मुठीत धरुनच प्रवास

पावसाळ्याच्या दिवसातही येथील नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात. येथील नागरिकांना खरी समस्या असते ती रात्रीच्या वेळी. कारण काही काम निघाले आणि पलिकडे जावे लागत असेल तर रात्रीच्या वेळी समस्या जाणवते. महिलांनाही सायंकाळ झाली की, या ठिकाणाहून जाणे कठीण जात आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिक, महिला आणि लहान मुले जीव धोक्यात घालूनच प्रवास करत आहेत.

शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

शाळेला जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनीही याचा आधार घेत शाळेला ये जा करतात. पावसाळ्याच्या दिवसातही येथील मुलं जीव मुठीत धरुन शाळेसाठी प्रवास करतात. विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी हा प्रवासाचा पर्याय धोकादायक आहे, मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

राजकारण्यांची अश्वासनांची खैरात

वेगवेगळ्या निवडणुकी जाहीर झाल्या की अशा गावांकडे लोकप्रतिनिधी वळतात, आणि अश्वासनांची खैरात करतात. मग एकदा निवडणूक झाली की, पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणत पुढे येणाऱ्या निवडणुकींची वाट बघत बसायची. गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी या ठिकाणी पूल व्हावा म्हणून मागणी करण्यात येत आहे मात्र .याकडे ना सरकार लक्ष देते ना शासन. कोसेसरी गाव मात्र गेल्या कित्येक वर्षापासून आपला विकास व्हावा म्हणून अजूनही पाण्यातूनच आणि जीव धोक्यात घालूनच प्रवास करत आहे. या गावाकडे आता कोणते सरकार लक्ष देणार असा सवाल येथील नागरिक करत आहेत.

संबंधित बातम्या

Ajit Pawar : ‘एकेकाळी 14 आमदार होते, ते का गेले याचं आत्मपरीक्षण राज ठाकरेंनी करावं’

Kolhapur North by-election: कोल्हापुरात मतदारांना पेटीएमद्वारे एक हजाराची लाच?, ईडीकडे तक्रार करणार: चंद्रकांत पाटील

Sujat Ambedkar : ‘अमित ठाकरेंना हनुमान चालिसा बोलायला लावा, तिकडे एकही बहुजन मुलगा नको’

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.