राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले, कोल्हापुरातील नद्यांना पूर

येत्या 4 तासात मुंबईत हवामान विभागाने मुसळधार पावसाचा ((IMD rain prediction) इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे केले आहे.

राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले, कोल्हापुरातील नद्यांना पूर
Follow us
| Updated on: Sep 08, 2019 | 9:23 AM

मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह (Mumbai rain) कोकण, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rainfall) कोसळत आहे. कोल्हापुरातील धरणक्षेत्रात (Kolhapur rain) मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे (Radhanagri Dam) सातही स्वयंचलित दरवाजे उघडले असून 11 हजार 300 क्यूसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सर्वच नद्यांना पूर (kolhapur flood) आला आहे.

कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. कोल्हापुरात अशाचप्रकारे पाऊस सुरु राहिला आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत एक फुटांनी वाढ झाली, तर कोल्हापुरात पुन्हा पूरस्थिती उद्भवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान सद्यस्थितीत कोल्हापुरातील 66 बंधारे पाण्याखाली गेले असून सर्वच नद्यांना पूर आला आहे.

तर दुसरीकडे मुंबईसह कोकण, कोल्हापूर, पुणे यासारख्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) पडत आहे. मुंबई, ठाणे या ठिकाणी येत्या 4 तासात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा ((IMD rain prediction) इशारा देण्यात आला होता. मात्र 4 तास उलटूनही पावसाचा जोर अद्याप कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्वीटद्वारे केले आहे.

त्याशिवाय राज्यात पुढील 48 तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा (IMD rain prediction) अंदाज  वर्तवण्यात आला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते.

मुंबईत गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसाचा गणेशभक्तांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

भिवंडीत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कामवारी नदीचा संरक्षक कठडा कोसळला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शेलार ग्रामपंचायत हद्दीतील विसर्जन घाट विसर्जनासाठी बंद करण्यात आला आहे. तर जवळच्या टिळक घाटावर गर्दी वाढलेली दिसत आहे. त्यामुळे आजूबाजूचा परिसर खचला आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.