कोरोनामुळे आमदार भालकेंसह पंढरपूरच्या राजकारण आणि आध्यात्मिक क्षेत्रातील ‘हे’ 6 रत्न हिरावले!

कोरोनाने तीर्थक्षेत्र पंढरपूर शहर आणि तालुक्यात सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक अशा सर्वच बाजूंनी प्रचंड नुकसान झाले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:10 PM, 28 Nov 2020
या वर्षी पंढरपुरात महापूर आल्यावर भालके यांनी पूरग्रस्त भागांची अनोख्या पद्धतीने पाहणी केली होती. पुरातून स्वत: होडी चालवून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला होता.

पंढरपूर : कोरोनामुळे (Corona) पंढरपूरच्या (Pandharpur) राजकारणातील आणि आध्यात्मिक क्षेत्रातील सहा रत्न हिरावले आहेत. कोरोनाने सर्वच क्षेत्रात हानी पोहोचवली असली तरी आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरीचे आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय नुकसान झालं आहे. कोरोनाने तीर्थक्षेत्र पंढरपूर शहर आणि तालुक्यात सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक अशा सर्वच बाजूंनी प्रचंड नुकसान झाले आहे. या तिन्ही खेत्रातील दिग्गज कोरोनाचे बळी ठरले आहे. एकामागून एक असे सहाजण कोरोनामुळे गेले आणि पंढरपूरचे बुरुजच ढासळलं. (Pandharpur loses star politics and spiritual workers because of corona)

राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील यांच्यासह कुटुंबातील तिघांचा मृत्यू हा पंढरपूर शहरासह संपूर्ण विठ्ठल नगरिला मोठा हादरा होता. राजाबापू पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तसंच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. त्यांचा जिल्ह्यात राजकारणात मोठा गट होता. बापुंच्या निधनाने कार्यकर्ते आता पोरके झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. राजाबापू पाटील यांचं 13 ऑगस्ट 2020 रोजी कोरोनामुळे निधन झालं. दु:खदायक बाब म्हणजे राजाबापू यांच्यासह त्यांचे धाकटे बंधू महेश पाटील आणि चुलते डॉ. अनंतराव पाटील यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला.

पंढरपूरचे 25 वर्ष आमदार असलेले सुधाकरपंत परिचारक यांचेदेखील कोरोनाने निधन झाले. त्यामुळे पंढरपूरच्या राजकारणात तसेच समाजकारणाची मोठी हानी झाली. अनेक बंद पडलेल्या संस्था त्यांनी अगदी व्यवस्थीतपणे चालवून एक आदर्श निर्माण केला होता. सुधाकरपंत परिचारक हे सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते होते. त्यांचा जिल्ह्यातील राजकारणावर मोठी पकड होती. यांनाही कोरोनाने गाठलं. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात 17 ऑगस्ट 2020 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सलग तीन धक्के पंढरपुरला बसल्यानंतर ही कोरोनाचा तांडव थांबला नाही. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत रामदास महाराज जाधव उर्फ कैकाडी महाराज यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. कैकाडी महाराज राष्ट्रसंत कैकाडी बाबांचे पुतणे ह. भ. प. रामदास महाराज जाधव यांचे अकलूज इथं 25 सप्टेंबर 2020 रोजी उपचारादरम्यान निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. (Pandharpur loses star politics and spiritual workers because of corona)

यानंतर लगेच भागावताचार्य वा ना उत्पात यांना कोरोनाने गाठले. वा ना उत्पात संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आपल्या रसाळ वाणीने संपूर्ण महाराष्टाला भागवत कथेने मंत्रमुग्ध करणारे भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा ना उत्पात यांचे कोरोनामुळे 28 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले. पुण्यात उपचारादरम्यान वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

यानंतर नाना म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्यासारख्या झुंजार आमदाराला आपला जीव गमवावा लागला. आमदार भालकेंनी कोरोनवर मातही केली. मात्र, त्यांना आगोदर असणाऱ्या शारीरिक व्याधीमूळे आपला जीव गमवावा लागला. भारत भालके राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार होते. 29 नोव्हेंबर 2020 निधन झालं. या कोरोनामुळे पंढरपुर शहराचे अतोनात नुकसान झाले आहे. आता हा मृत्यूचा तांडव विठ्ठलच सावरले अशी अपेक्षा सगळ्या भक्तांना आहे.

इतर बातम्या –

Bharat Bhalke Funeral live : भारत भालके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, मुलाकडून भडाग्नी

Bharat Bhalke | Last Rites | भारत भालके यांचं पार्थिव पंढरपुरात, नागरिकांना अश्रू अनावर

 

(Pandharpur loses star politics and spiritual workers because of corona)