कुठल्याही परिस्थितीत यंदाचा आषाढी पालखी सोहळा पंढरपूरला पायी जाणार, वारकरी आणि महाराज मंडळींची भूमिका

कुठल्याही परिस्थितीत यंदाचा आषाढी पालखी सोहळा पंढरपूरला पायी जाणार, वारकरी आणि महाराज मंडळींची भूमिका
आषाढी वारी पालखी सोहळा (प्रातिनिधिक फोटो)

कोणत्याही परिस्थितीत यंदाचा आषाढी पालखी सोहळा पायी पंढरपूरकडे नेला जाईल, अशी ठाम भूमिका वारकरी व महाराज मंडळींनी घेतली आहे.

सागर जोशी

|

May 27, 2021 | 3:01 PM

पंढरपूर : वारकरी संप्रदायात अत्यंत महत्वाचा मानला जाणारा आषाढी पायी पालखी सोहळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पायी पालखी सोहळा निघणार की गेल्यावर्षीप्रमाणे संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपुरात आणल्या जाणार याकडे राज्याच्या लक्ष लागलं आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत यंदाचा आषाढी पालखी सोहळा पायी पंढरपूरकडे नेला जाईल, अशी ठाम भूमिका वारकरी व महाराज मंडळींनी घेतली आहे, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष हभप भाऊसाहेब महाराज गोसावी यांनी दिली आहे. (Warakaris demand’s this year’s Ashadi Palkhi ceremony as per tradition)

आषाढी पालखी सोहळ्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी मुंबईत महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे महाराष्ट्रातील वारकरी आणि महाराज मंडळींचे लक्ष लागले आहे. कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी आषाढी पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आणि मानाच्या सात संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपुरात आणण्यात आल्या. त्यानंतर मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी सोहळा पार पडला. यावर्षी कोरोनाचं सावट दूर होऊन आषाढी पालखी सोहळा मोठ्या थाटामाठात निघेल अशी वारकऱ्यांना आशा होती. मात्र जानेवारीपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलंय.

पालखी सोहळ्यावरुन वारकरी विरुध्द सरकार?

दरम्यान, आषाढी पायी पालखी सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. यावर्षी 1 जुलै रोजी संत तुकाराम आणि 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जनजीवन ठप्प आहे. त्यामुळे यंदाही आषाढी पालखी सोहळ्यावर कोरोनाचं सावट आहे. अशातच वारकरी आणि महाराज मंडळींनी यंदाचा आषाढी पालखी सोहळा पायी पंढरपूरकडे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे पायी पालखी सोहळ्यावरुन वारकरी विरुध्द सरकार असा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘वारकऱ्यांचं लसीकरण करावं’

आषाढी पायी पालखी सोहळा तोंडावर आला आहे. कोरोनाचे सर्वनियम पाळून पायी पालखी सोहळ्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी. गतवर्षी वारकर्यांनी राज्य शासनाला सहकार्य केले होते. यावर्षी राज्य शासनाने वारकऱ्यांना सहकार्य करावे. मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत पायी पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सरकारने वारकऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावं. तसंच आषाढी यात्रेसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीला प्रमुख महाराज मंडळी आणि विविध वारकरी संघटनांच्या लोकांना बोलवावं अशी मागणी भाऊसाहेब महाराज गोसावी यानी केली आहे.

संबंधित बातम्या :

लगेचच सर्व काही उघडणार नाही, लॉकडाऊनच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं रोखठोक उत्तर

Pandharpur Wari | माऊलींच्या पालखीची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्धार, नियमांचे काटेकोर पालन करणार

Warakaris demand’s this year’s Ashadi Palkhi ceremony as per tradition

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें