रायकर कुटुंबावर पुन्हा आभाळ कोसळलं !

पांडुरंग रायकर यांचे वडील लक्ष्मण रायकर यांचे कोरोनाने निधन झालं आहे.

रायकर कुटुंबावर पुन्हा आभाळ कोसळलं !
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 3:32 PM

अहमदनगर : टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झालं होतं. त्या धक्क्यातून कुटुंब आणखी सावरलेही नव्हते तोच रायकर कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. पांडुरंग रायकर यांचे वडील लक्ष्मण रायकर यांचे कोरोनाने निधन झालं आहे. (Pandurang Raikar father Laxman Raikar died corona)

अहमदनगरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांचं शरीर उपचाराला साथ देत नव्हते. अखेर उपचारादरम्यान आज सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

लक्ष्मण रायकर श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथे भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी सून आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण रायकर हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते. पंचक्रोशीत त्यांना चांगला मान होता. पांडुरंग रायकर यांना जाऊन चार महिनेही पूर्ण होत नाहीत तोपर्यंतच रायकर कुटुंबावर दुसरा मोठा आघात झालाय. यामुळे रायकर कुटुंब कोलमडून पडलंय तर हंगेवाडी गाव शोकसागरात बुडालंय.

तीन महिन्यांपूर्वी पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू

कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. 2 सप्टेंबर रोजी पुण्यातल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डियाक अँम्बुलन्स न मिळाल्याने त्यांना योग्य ते उपचार वेळेवर मिळाले नाहीत. अखेर वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

रायकर कुटुंबावर गेल्या चार महिन्यांत दुसरा मोठा आघात झाला आहे. टीव्ही 9 चं संपूर्ण कुटुंब रायकर कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे. कुटुंबाला ह्या दु:खातून सावरण्याचं बळ मिळो.

(Pandurang Raikar father Laxman Raikar died corona)

संबंधित बातम्या

अ‍ॅम्ब्युलन्स नाही, बेड नाही, पांडुरंगचा अखेरपर्यंत संघर्ष, आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा घटनाक्रम

Non Stop LIVE Update
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.