पुण्यात विकलं जाणारं हलक्या प्रतीचं 10 लाखांचं पनीर साताऱ्यात जप्त

सातारा : अन्न आणि औषध प्रशासनाच्या सातारा कार्यालयाने टाकलेल्या धाडीत सुमारे 10 लाखाचा पनीर साठा जप्त केला आहे. प्रशासनाने काल तासवडे येथील ‘संतोष मिल्क अॅण्ड मिल्क प्रोडक्ट’वर धाड टाकून ही कारवाई केली. महत्त्वाचं म्हणजे साताऱ्यात हे पनीर पकडलं असलं, तरी त्याची विक्री पुण्यात होत होती. हलक्या दर्जाचे पनीर उच्च दर्जाचे भासवून त्याचं उत्पादन आणि विक्री करण्यात …

पुण्यात विकलं जाणारं हलक्या प्रतीचं 10 लाखांचं पनीर साताऱ्यात जप्त

सातारा : अन्न आणि औषध प्रशासनाच्या सातारा कार्यालयाने टाकलेल्या धाडीत सुमारे 10 लाखाचा पनीर साठा जप्त केला आहे. प्रशासनाने काल तासवडे येथील ‘संतोष मिल्क अॅण्ड मिल्क प्रोडक्ट’वर धाड टाकून ही कारवाई केली. महत्त्वाचं म्हणजे साताऱ्यात हे पनीर पकडलं असलं, तरी त्याची विक्री पुण्यात होत होती. हलक्या दर्जाचे पनीर उच्च दर्जाचे भासवून त्याचं उत्पादन आणि विक्री करण्यात येत होती. याबाबतची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली. त्यावरुन एमआयडीसी तासवडे येथील संतोष मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. वर छापा टाकण्यात आला. यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या सातारा कार्यालयाने 9 लाख 73 हजार 992 रूपये किमतीचं मलई पनीर आणि क्रीमचा साठा जप्त केला.

साताऱ्याचे सुपुत्र आणि पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून, अनेक नामांकित कंपन्यावर धडक कारवाई सुरु आहेत. यापुढेही या कारवाया अशाच सुरु राहातील असे देशमुख यांनी सांगितले.

पुणे कार्यालयाने सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत, कॅम्प पुणे येथील मॉडर्न डेअरीवर छापा टाकून 1 लाख 23 हजार 691 रुपये किमतीचे, हलक्या प्रतीचे दही, मलई, पनीर आणि क्रीम जप्त केले होते. हे दुग्धजन्य पदार्थ साताऱ्यातील कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील  संतोष मिल्क अॅण्ड  मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. इथे उत्पादित केल्याचे आढळून आले होते. त्यानुसार सातारा कार्यालयाने छापेमारी केली.

मलई पनीरच्या 240 ग्रॅमच्या पॅकेटवर मॉडर्न डेअरी, कॅम्प पुणे असे छापले होते. प्रत्यक्षात  पनीरचे उत्पादन कर्नाटकातील महालीगपूर इथलं होतं. पण ते संतोष मिल्क अॅण्ड  मिल्क प्रॉडक्ट्समधील असल्याचं सांगितलं जात होतं.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ज्या ठिकाणी उत्पादित केले जात होते, त्याठिकाणी अस्वच्छता आणि जिवंत किटकांचा वावर आढळून आला. या डेअरीमध्ये आढळून आलेल्या अन्नपदार्थ पॅक करण्याच्या लेबलवर दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे मार्केटिंग मॉडर्न डेअरी कॅम्प पुणे यांनी केल्याचे आढळले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *