पॅरासिलिंगची दोर तुटली, मुरुड किनाऱ्यावर पुण्यातील मुलाचा मृत्यू

रायगड : पॅरासिलिंग करताना दोर तुटल्याने पुण्यातील तरुणाचा रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारी मृत्यू झालाय. वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत असताना उंचावर गेलेल्या पॅराशूटचा दोर तुटला आणि वडिलांसह मुलगाही खाली कोसळला. यात 15 वर्षीय वेदांतचा जागीच मृत्यू झालाय, तर वडील गणेश पवार यांना मुरुडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. रायगडच्या समुद्रकिनारी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. मात्र उन्हाळी …

पॅरासिलिंगची दोर तुटली, मुरुड किनाऱ्यावर पुण्यातील मुलाचा मृत्यू

रायगड : पॅरासिलिंग करताना दोर तुटल्याने पुण्यातील तरुणाचा रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्रकिनारी मृत्यू झालाय. वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत असताना उंचावर गेलेल्या पॅराशूटचा दोर तुटला आणि वडिलांसह मुलगाही खाली कोसळला. यात 15 वर्षीय वेदांतचा जागीच मृत्यू झालाय, तर वडील गणेश पवार यांना मुरुडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

रायगडच्या समुद्रकिनारी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. मात्र उन्हाळी सुट्टीमध्ये पर्यटकांच्या संख्येमध्ये नेहमीच वाढ होते. या ठिकाणी असलेल्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्याकरीता कुठलाही अनुभव नसलेल्या वाटर स्पोर्ट्स रायडर आणि साहित्याची परीक्षण करणारी यत्रंणा कुचकामी ठरल्याचं मुरुडच्या उदाहरणामुळे पुन्हा एकदा समोर आलंय.

याचाच फटका पुण्यातील कसबा पेठेत राहणाऱ्या पवार कुटुंबीयांना बसला. समुद्र किनाऱ्यालगत बोटीवर दोर द्वारे पॅराशूटला पर्यटकांना बांधून समुद्राच्या पाण्यावरुन पॅराशूटद्वारे उडण्याचा आनंद घेतला जातो. परंतु या घटनेमध्ये केवळ मेरीटाईम बोर्डाच्या दुर्लक्षामुळे निकृष्ट साहित्य वापरुन पर्यटकांचा जीव धोक्यात घातला जात असल्याचा आरोप केला जातोय.

सदर दुर्घटनेची नोंद करण्याचं काम मुरुड पोलिसांनी केलं. वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आलाय. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. पण मुरुडमधील या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *