क्या हुआ तेरा वादा?; फडणवीसांना बांधावर मिळालेल्या निवेदनातून सवाल

परभणीतल्या एका धनगर समाजातील शेतकऱ्याने देवेंद्र फडणवीसांना क्या हुआ तेरा वादा म्हणत आरक्षणाबाबतच्या आश्वासनाची आठवण करुन दिली.

क्या हुआ तेरा वादा?; फडणवीसांना बांधावर मिळालेल्या निवेदनातून सवाल

परभणी : पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतो, असं तत्कालिन मुख्यमंत्री तसंच सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आज त्यांच्या याच आश्वासनाची आठवण परभणीतल्या एका धनगर समाजातील शेतकऱ्याने त्यांना करून दिली. फडणवीस दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने परभणी दौऱ्यावर आहेत. त्यावेळी शेतकऱ्याने निवेदनाद्वारे ‘क्या हुआ तेरा वादा’, असं म्हणत फडणवीसांना त्यांच्या आश्वासनाबद्दल विचारलं. (Parbhani Dhangar people Question To Devendra fadanvis Kya Hua tera Wada)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज ते परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी सोनपेठ ताल्युक्यातील विनायक कुलकर्णी यांच्या शेतात जाऊन कपाशीची पाहणी केली. तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसंच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मदत मिळवून देण्यासाठी आम्ही सरकारशी भांडू, असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. त्याचवेळी शेतकऱ्याच्या बाजूला उपस्थित असलेल्या काही लोकांपैकी एका व्यक्तीने फडणवीसांना एक निवेदन दिले. निवेदन उघडून पाहताच फडणवीस आवाक् झाले. त्या निवेदनावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, ‘क्या हुआ तेरा वादा….!’

पहिल्याच कॅबिनेटमध्ये आपण धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण देतो म्हटले होते. आता ही आपलं केंद्रात सरकार असल्याने आपण धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी या वेळी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली.

धनगर बांधवाचं निवेदन उघडून पाहताच देवेंद्र फडणवीस खजील झाले आणि स्मित हास्य करून तिथून निघून जाणं त्यांनी पसंत केलं. ‘क्या हुआ तेरा वादा’ या गीताच्या पंक्तींचा अनुभव फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील त्यांना आला होता. सोलापूरच्या सभेत बोलताना धनगर बांधवांनी हे गीत ऐकवत त्यांना आरक्षणाबाबत विचारणा केली होती. (Parbhani Dhangar people Question To Devendra fadanvis Kya Hua tera Wada )

संबंधित बातम्या

‘क्या हुआ तेरा वादा?’ उद्धव ठाकरेंच्या साडेतीन वर्ष जुन्या व्हिडीओवरुन मनसेच्या अविनाश जाधवांचा सवाल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *