आजोबा आणि वडिलांना कमीपणा येईल असं पार्थ कधीही वागणार नाही : सुनेत्रा पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थ पवारांसाठी आता संपूर्ण कुटुंब प्रचाराच्या रिंगणात उतरलंय. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार यांनीही मुलाचा प्रचार केला. आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा वाटेल असं पार्थ वागणार नाही, असा विश्वास …

sunetra ajit pawar, आजोबा आणि वडिलांना कमीपणा येईल असं पार्थ कधीही वागणार नाही : सुनेत्रा पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थ पवारांसाठी आता संपूर्ण कुटुंब प्रचाराच्या रिंगणात उतरलंय. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार यांनीही मुलाचा प्रचार केला. आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा वाटेल असं पार्थ वागणार नाही, असा विश्वास आई सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड शहरात महिलांनी आयोजित केलेल्या बैठकीत दापोडी येथे सुनेत्रा पवार बोलत होत्या. सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, “पार्थ हा शरद पवार अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे. राजकीय बाळकडू त्याला घरातून मिळालेलं आहे. आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा येईल असं तो वागणार नाही.”

नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पार्थ पवार प्रयत्न करतील, अशी आई म्हणून खात्री आहे. तुम्ही पार्थला संधी द्या असं देखील सुनेत्रा पवार म्हणाल्या. महिला, तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. मोदी सरकारच्या काळात अनेक नवीन शब्द ऐकायला मिळाले. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थला उमेदवारी मिळावी ही लोकांची मागणी होती, त्यामुळे पार्थला उमेदवारी देण्यात आल्याचंही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? पाहा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *