पवारांनी धनंजय मुंडेंच्या घरी रणजिंतसिंहांचं भाषण ऐकलं, नंतर माढ्याच्या उमेदवारासाठी बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत भाजपने आणखी एक मोठा नेता गळाला लावलाय. सोलापूरमधील मोहिते पाटील घराण्यातील रणजित सिंह मोहिते पाटलांनी असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करताना त्यांनी विकासकामांचं कौतुक केलं. रणजित सिंह पाटलांचं हे संपूर्ण भाषण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ऐकलं. …

पवारांनी धनंजय मुंडेंच्या घरी रणजिंतसिंहांचं भाषण ऐकलं, नंतर माढ्याच्या उमेदवारासाठी बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत भाजपने आणखी एक मोठा नेता गळाला लावलाय. सोलापूरमधील मोहिते पाटील घराण्यातील रणजित सिंह मोहिते पाटलांनी असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करताना त्यांनी विकासकामांचं कौतुक केलं. रणजित सिंह पाटलांचं हे संपूर्ण भाषण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ऐकलं. या भाषणानंतर माढा मतदारसंघाचा उमेदवार ठरवण्यासाठी बैठक झाली.

माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची कोणतीही शक्यता नसल्याने रणजित सिंह पाटलांनी भाजपात प्रवेश केला. रणजित सिंह हे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय सिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आहेत. मोहिते पाटील घराण्याचं माढ्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

शरद पवारांनी ऐकलेलं रणजित सिंहांचं भाषण पाहा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *