वसईत कलाकारांच्या शूटिंग लूकमुळे सुरक्षारक्षक घाबरला, दहशतवादी घुसल्याची चर्चा

वसई : वसईत दहशतवादी घुसल्याच्या माहितीमुळे सध्या पालघर जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरलं आहे. मात्र ते दहशतवादी नसून सिनेमाचे कलाकार असल्याची पालघर पोलिसांनी खात्री केली आहे. यामुळे पालघरमधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. वसई पश्चिमेकडील भारत बँकेच्या सुरक्षा रक्षकाला सोमवारी 27 एप्रिलला दुपारी 3 च्या सुमारास एक व्यक्ती हत्यार घेऊन वावरत असल्याचं दिसलं. या व्यक्तीच्या दिसण्यावरुन …

वसईत कलाकारांच्या शूटिंग लूकमुळे सुरक्षारक्षक घाबरला, दहशतवादी घुसल्याची चर्चा

वसई : वसईत दहशतवादी घुसल्याच्या माहितीमुळे सध्या पालघर जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरलं आहे. मात्र ते दहशतवादी नसून सिनेमाचे कलाकार असल्याची पालघर पोलिसांनी खात्री केली आहे. यामुळे पालघरमधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

वसई पश्चिमेकडील भारत बँकेच्या सुरक्षा रक्षकाला सोमवारी 27 एप्रिलला दुपारी 3 च्या सुमारास एक व्यक्ती हत्यार घेऊन वावरत असल्याचं दिसलं. या व्यक्तीच्या दिसण्यावरुन आणि हालचालीवरुन तो आतंकवादी असल्याचा सुरक्षा रक्षकाला संशय आला. यानंतर त्याने तात्काळ पोलीस कंट्रोल रुमला फोन केला. पोलिसांना त्या सुरक्षा रक्षकाने पालघरमध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती दिली.

सुरक्षा रक्षकाने केलेल्या वर्णनावरून पालघर पोलिसांनी सदर व्यक्तीचा तपस सुरु केला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी हा व्यक्ती दिसलेल्या परिसरात सीसीटिव्हीची तपासणी सुरु केली. तपासणी करत असतानाच वसई पश्चिमेकडील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले. यावेळी हा व्यक्ती एका वाहनामध्ये बसून पुढे गेल्याचं पोलिसांना समजलं.

पोलिसांनी तात्काळ गाडीचा नंबर घेत शहरात नाकाबंदी लागू केली. नाकाबंदीत हा तरुण तात्काळ पकडला गेला. मात्र त्यावेळी हा तरुण आतंकवादी नसून सिनेमात काम करणार असल्याचं निष्पन्न झालं. याबाबत पोलिसांनी सर्व चौकशी करुन संबंधित तरुणाला सोडून दिलं आहे.

मात्र पालघर पोलिसांची तत्परता आणि अवघ्या काही तासात अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला शोधण्याच कसब यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. त्याशिवाय पोलिसांनी जागृकता दाखवणाऱ्या भारत बँकेच्या त्या सुरक्षा रक्षकाचा सत्कार केला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *