राज्यातलं सर्वात जास्त महाग पेट्रोल धर्माबादमध्ये, वाचा काय आहे कारण?

अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यात पेट्रोलचे भाव प्रति लिटर मागे 4 रुपयांनी कमी असतात. त्यामुळे इंधन भरण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जण तेलंगणात ये-जा करतात.

राज्यातलं सर्वात जास्त महाग पेट्रोल धर्माबादमध्ये, वाचा काय आहे कारण?
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 10:15 AM

नांदेड : राज्यातील सर्वात महागडे इंधन हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये विकलं जात आहे. धर्माबाद हा तेलंगणा राज्याला लागून असलेला तालुका आहे. आज धर्माबादमध्ये पेट्रोल 96.39 प्रति लिटरने ग्राहकांना घ्यावे लागतं आहे. तर एका लिटर डिझेलसाठी 85.41 रुपये मोजावे लागत आहेत. बरोबर आजच्याच दिवशी एका महिन्यांपूर्वी धर्माबादमध्ये पेट्रोल 93 रुपये 73 पैसे प्रति लिटर विकलं जात होतं. मात्र, इथून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यात पेट्रोलचे भाव प्रति लिटर मागे 4 रुपयांनी कमी असतात. त्यामुळे इंधन भरण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जण तेलंगणात ये-जा करतात. (petrol rates most expensive petrol in the state in Dharmabad read what is the reason)

धर्माबादला महागडे इंधन का ?

धर्माबाद शहराला इंधनाचा पुरवठा हा महाराष्ट्रातील सोलापूर इथल्या ऑइल डेपोतून होतो. धर्माबाद ते सोलापूर हे अंतर तीनशे किलोमीटर आहे. इंधनाच्या वाहतुकीचा खर्च वाढत गेल्याने धर्माबादमध्ये किंमतीवर परिणाम होतो. त्यातून महाराष्ट्रातील सर्वात महागडे इंधन हे धर्माबाद शहरात विकलं जातं. त्या उलट शेजारच्या तेलंगणा राज्यात मात्र इंधन एका लिटरच्या मागे पाच रुपयांनी स्वस्त आहे.

कारण, तेलंगणा राज्यातील इथल्या सीमावर्ती भागाला इंधनाचा पुरवठा हा हैद्राबाद डेपोतून होतो. इथून हैद्राबादचे अंतर अवघे दीडशे किलोमीटर आहे. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा तेलंगणाचा इंधनाच्या वाहतुकीचा खर्च कमी होतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणा राज्यात इंधन स्वस्त आहे.

सीमावर्ती भागातील शेतकरी हैराण

धर्माबादचा सीमावर्ती भाग गोदावरी नदीमुळे समृद्ध म्हणून ओळखल्या जातो. इथले शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतात बारामाही पिके घेतात. शेतीच्या अनेक कामांसाठी डिझेलची गरज भासते, अश्या वेळी सीमावर्ती भागातील हे शेतकरी आपल्या महाराष्ट्रातील महागडे इंधन घेण्यापेक्षा तेलंगणात जाऊन मोठ्या प्रमाणात इंधनाची खरेदी करतात. त्यामुळे धर्माबादचे पेट्रोल पंप हे नेहमीच सुनेसुने दिसतात. तर शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यातील पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या असतात.

आपल्या देशात अनेक जागी धर्माबादसारखीच समस्या आहे. प्रत्येक राज्याची महसूल आणि कर रचना वेगवेगळी आहे. इंधन विक्रीवरचा प्रत्येक राज्याचा वेगवेगळा अधिभार असतो. त्यामुळे ऑइल डेपोपासून अंतर कितीही असू द्या त्या त्या राज्यात त्यांच्याच ऑइल डेपोपासून इंधनाचा पुरवठा केल्या जातो. पण ग्राहकांना मात्र या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यात आर्थिक फटका बसतो ते वेगळंच.

पेट्रोल महागण्याचं कारण काय?

भारतात दिवसेंदिवस पेट्रोल महाग होत चालले आहे. या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. देशातील करप्रणाली हे या महागाईचे मुख्य कारण आहे. विशेष म्हणजे आपल्या देशात प्रत्येक राज्यात वेगवेळ्या प्रकारचे कर आहेत. त्यामुळे भारत सरकार आणि राज्य सरकार अशा दोनी संस्थांकडून वेगवेगळे कर आकारले जातात. याच कराणामुळे आपल्या देशात पेट्रोल महाग आहे. (petrol rates most expensive petrol in the state in Dharmabad read what is the reason)

संबंधित बातम्या :

Petrol-Diesel Price Today | प्रजासत्ताक दिनालाही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, पाहा तुमच्या शहरातील दर

देशात ‘या’ ठिकाणी पेट्रोल शंभरी पार, तर जगात ‘या’ ठिकाणी पेट्रोल 2 रुपये प्रतिलीटर!

कोरोना काळात शेतीनं दिली साथ, यंद्याच्या Budget मध्ये मिळणार का शेतकऱ्यांना दिलासा?

(petrol rates most expensive petrol in the state in Dharmabad read what is the reason)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.