Satara doctor death : मृत डॉक्टर महिलेच्या गावात मोठा थरार… थेट अंगावरच पेट्रोल… सर्वच हादरले, पोलिसांची तारांबळ

फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दोन पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केल्याने त्यांना अटक झाली आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय नेत्यांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास व्हावा या मागणीसाठी बीडच्या वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या गावातील नागरिकांकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू करण्यात आले. त्यावेळी आंदोलक आक्रमक झाले.

Satara doctor death : मृत डॉक्टर महिलेच्या गावात मोठा थरार... थेट अंगावरच पेट्रोल... सर्वच हादरले, पोलिसांची तारांबळ
मृत डॉक्टर महिलेच्या गावात मोठा थरार
| Updated on: Oct 30, 2025 | 3:18 PM

साताऱ्यातील फलटणमधील रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेने गेल्या आठवड्यात फलटण शहरातीलच एका हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या केली. जीव देण्यापूर्वी तिने हातावर एक नोट लिहून तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेले पोलीस गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं लिहून त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. दोन दिवसांच्या आता पोलिसांनी दोघांना अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. मात्र या डॉक्टर महिलेच्या मृत्यूचे गूढ अजूनही उलगडले नसून त्या वेगवेगळे कंगोरे फुटत आहेत. डॉक्टर महिलेने आतम्हत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा संशय काही नेत्यांनी व्यक्त केला असून काल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अनेक पुरावे दाखव गंभीर आरोप केले आहेत.

याप्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून ती डॉक्टर महिला ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच पोलीस अधिकारी गोपाल बदने याचा मोबाईलही पोलिसांना सापडला आहे, मृत डॉक्टर महिलेची डायरीदेखील पोलिसांनी हस्तगत केली असून त्यातून बरीच महत्वाची माहिती हाथी येऊ शकते, अनेक महत्वाचे खुलासे होऊ शकतात .

मृत डॉक्टर महिलेच्या गावात थरार

दरम्यान ती मृत डॉक्टर महिला ही मूळची बीडच्या वडवणी तालुक्यातील होती. तिच्या मृत्यूनंतर अनेक तर्क वितर्क व्यक्त होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा एसआयटीच्या माध्यमातून तपास करण्यात यावा अशी मागणी मृत डॉक्टर महिलेचे नातेवाईक, कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केली जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांनी जाहीर माफी मागावी या मागण्यांसाठी आज बीडच्या वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरच्या गावातील नागरिकांकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू करण्यात आले.

Satara doctor death : एकटी आहे, सकाळी पेमेंट करते सांगून रूममध्ये गेली, नंतर… डॉक्टर महिलेचं शेवटचं संभाषण काय?

आमची लेक गेली तरी यांना जाग येत नाही

त्यात आंदोलनादरम्यान आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी पाण्याच्या टाकीवरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. आमची लेक गेली तरी यांना जाग येत नाही.. तिला न्याय मिळत नाही, हे प्रशासन येत नाही असं म्हणत संतप्त प्रतिक्रिया देत आंदोलनकाने उडी मारण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्यांनी अंगावर पेट्रोल ओतुन घेण्याचा प्रयत्न केला. अखेर इतर आंदोलकांनी आणि गावकऱ्यांनी त्यांना वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

3 नोव्हेंबरला धडक मोर्चा

बीड मधील डॉक्टर महिलाआत्महत्या प्रकरणात येत्या 3 नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातून फलटण पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दिपक केदार यांनी बीड मधील पीडित डॉक्टर महिलेच्या कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली. या भेटीदरम्यान संपूर्ण घटनेची माहिती केदार यांनी कुटुंबाकडून जाणून घेतली . त्या डॉक्टर महिलेची आत्महत्या नसून हत्या आहे. फेब्रुवारीपासून डॉक्टरला त्या ठिकाणी त्रास होता. आणि त्याची तक्रार देखील तिने केली होती. सामूहिक कट करून ही हत्या करण्यात आली. महिला आयोगाने मृत डॉक्टरच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जन उठावाशिवाय पर्याय नाही, आता न्याय देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आणि त्याचा एक भाग म्हणून 3 नोव्हेंबरला फलटण पोलीस ठाण्यावर धडक देणार असा इशारा दिपक केदार यांनी दिला आहे.