AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री-अपरात्री फक्त तिलाच… महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका तरुण डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्याला अटक झाली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी मृत डॉक्टरच्या कुटुंबाची भेट घेऊन पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

रात्री-अपरात्री फक्त तिलाच... महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा
| Updated on: Oct 26, 2025 | 12:17 PM
Share

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. याप्रकरणी विविध नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली असून, त्ंयाच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. आता याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मृत डॉक्टरच्या बीड येथील मूळ गावी जाऊन कुटुंबियांची भेट घेत संपूर्ण घटनेची माहिती घेतली.

तिचे कोणी ऐकले नाही आणि ती एकटी पडली

या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली, मृत डॉक्टरवर फेब्रुवारी महिन्यापासून तिथले पोलीस अधिकारी सातत्याने चुकीची कामे करण्यासाठी दबाव टाकत होते. डॉक्टरने पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि डीवायएसपींकडे वारंवार तक्रार करूनही तिचे कोणी ऐकले नाही आणि ती एकटी पडली, असा दावा सुरेश धस यांनी केला.

याप्रकरणी केवळ अटक झालेल्या दोघांवर कारवाई करून पुरेसे नाही. बदने आणि बनकर यांच्याव्यतिरिक्त जे जे अधिकारी, कर्मचारी किंवा इतर कोणी यात दोषी असतील, त्यांनाही आरोपी म्हणून घेतले पाहिजे. या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (SIT) स्थापन करण्यात यावी आणि या समितीत सर्व कर्मचारी महिला असावेत, अशी मागणी धस यांनी केली. याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले.

बाकीचे मेडिकल ऑफिसर नव्हते का?

आमदार सुरेश धस यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. पोलीस बदने हे खुर्चीवर बसून डॉक्टरला धमक्या देत होते. तसेच, फिटनेस सर्टिफिकेट देण्यावरूनही वाद झाला होता. विशेष म्हणजे, काही कर्मचाऱ्यांनी तुमचे बीडचे लोक असे… असे म्हणून डॉक्टरला हिणवण्याची भूमिका घेतली होती. रात्री अपरात्री फक्त तिलाच का बोलावले जात होते? बाकीचे मेडिकल ऑफिसर नव्हते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, कुटुंबीयांना मुलगी फक्त पीएम रूममध्येच दाखवण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.

आमदार सुरेश धस यांनी या आत्महत्येबाबतची संपूर्ण माहिती घेऊन त्या डॉक्टरला न्याय मिळेपर्यंत शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच, कागदोपत्री लढा देत हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.