VIDEO : सहा हत्यांच्या गुन्हेगाराकडे जेलमध्येही पिस्तुल

विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : कोल्हापूरमधील कळंबा जेलमध्ये हत्येच्या गुन्ह्यातील डॉ. संतोष पोळ या कैद्याच्या हातात पिस्तुल आढळल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. संतोष पोळवर हत्येचे 5 गुन्हे आहेत. डॉ. संतोष पोळ याने भुलीचे इंजेक्शनचे ओव्हरडोस देऊन सहा हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वाई हत्याकांडातील प्रमुख …

VIDEO : सहा हत्यांच्या गुन्हेगाराकडे जेलमध्येही पिस्तुल

विजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : कोल्हापूरमधील कळंबा जेलमध्ये हत्येच्या गुन्ह्यातील डॉ. संतोष पोळ या कैद्याच्या हातात पिस्तुल आढळल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. संतोष पोळवर हत्येचे 5 गुन्हे आहेत. डॉ. संतोष पोळ याने भुलीचे इंजेक्शनचे ओव्हरडोस देऊन सहा हत्या केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वाई हत्याकांडातील प्रमुख आरोपी संतोष पोळ कळंबा जेलमध्ये आहे. त्यानं जेलमध्ये देखील पिस्तुल दाखवत व्हिडीओ शूटिंग केलं आहे. कारागृह प्रशासनानं ही पिस्तुल बनावट असल्याचा दावा केला आहे. मात्र व्हिडिओ शूटिंगसाठी पोळकडे मोबाईल कुठून आला हा प्रश्न उभा राहतो आहे.

व्हिडीओत काय आहे?

वाई हत्याकांडातील आरोपी संतोष पोळने जेलमध्येच पिस्तुल दाखवत त्याचं चित्रिकरण केलं. व्हिडिओमध्ये पोळ स्वत: पिस्तूल रोखून दाखवत आहे. शिवाय, त्याने आपण केलेल्या गुन्ह्याविषयी माहिती दिली आहे. या सगळ्या प्रकारामुळे आता महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. मात्र व्हिडीओमध्ये दिसत असलेली पिस्तुल बनावटची असल्याचा दावा जेल प्रशासनानं केला आहे. मात्र पोळकडे मोबाईल कुठून आला, याची चौकशी आता वरिष्ठ पातळीवरुन होते आहे.

कोण आहे संतोष पोळ?

  • महाराष्ट्राला हदरवून सोडणाऱ्या वाई हत्याकांडातील प्रमुख आरोपी
  • मंगल जेधे हत्येप्रकरणी अटक केल्यानंतर एकूण 6 हत्या केल्याची कबुली
  • सहा हत्यांमध्ये 5 महिला आणि एका पुरुषाचा समावेश
  • सगळे मृतदेह आरोपी संतोष पोळ याच्याच फार्म हाऊसमध्ये सापडले
  • गेल्या अडीच वर्षांपासून संतोष पोळ कळंबा कारागृहात

कारागृह प्रशासन काय म्हणालं?

संतोष पोळ हा कारागृहात असल्यापासून प्रशासनाला त्रास देत आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांबाबत तक्रार केल्या जातात. त्यामुळे केवळ स्टंट करण्यासाठी संतोष पोळ यानं हे कृत्य केल्याचं कारागृह प्रशासन सांगतं आहे.

याच कळंबा कारागृहात नोव्हेंबर 2015 मध्ये गांजा पार्टी सुरु असल्याचा व्हिडोओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी तीन कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं होतं. मात्र आता चक्क कैद्यांचं आतमध्ये चित्रीकरण केलं आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *