आनंदाची बातमी! नाटकाची तिसरी घंटा वाजणार; ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ने शुभारंभ

‘मायबाप रसिकांसाठी सुरू करत आहोत…’ नाटक सुरू होण्याआधी हमखास कानावर येणारं हे वाक्य आता पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. (play theaters reopen soon in maharashtra)

  • कपिल देशपांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 18:09 PM, 30 Nov 2020

मुंबई: ‘मायबाप रसिकांसाठी सुरू करत आहोत…’ नाटक सुरू होण्याआधी हमखास कानावर येणारं हे वाक्य आता पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. तब्बल 9 महिन्याच्या लॉकडाऊन नंतर नाटकाची तिसरी घंटा पुन्हा वाजणार आहे. पुण्यात येत्या 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’च्या प्रयोगाने पुन्हा एकदा नाट्यगृह गजबजणार असून नाट्यरसिकांना पुन्हा एकदा नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे. (play theaters reopen soon in maharashtra)

कोरोना संसर्गमुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. 9 महिने हा लॉकडाऊन सुरू होता. या काळात सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. या लॉकडाऊनचा फटका सिनेमागृह आणि नाट्यगृहांनाही बसला. या काळात नाट्यगृहेही बंद होते. मात्र आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व गोष्टी हळूहळू सुरू होत आहेत. त्यामुळे नाट्यगृहेही सुरू करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर झी मराठी प्रस्तुत प्रशांत दामले आणि कविता लाड यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ने नाटकांचा श्रीगणेशा सुरू होणार आहे. पुण्यात 12 आणि 13 डिसेंबर रोजी या नाटकाचे प्रयोग रंगणार आहेत. या नाटकाच्या तिकिटांची विक्रीही सुरू झाली आहे.

कोरोना सुरक्षेच्या सर्व नियमांची काळजी घेऊनच नाटकाचे प्रयोग होणार आहेत. नाटक पाहण्यासाठी येणाऱ्या नाट्यरसिकांनी मास्क लावूनच नाटक पाहायला येण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे. तसेच प्रेक्षकांच्या हातावर सॅनिटायझर मारूनच त्यांना आत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक नाट्यरसिकाच्या शरीराचं तापमानही मोजण्यात येणार आहे. शिवाय नाट्यप्रयोगापूर्वी आणि नंतर प्रत्येक नाट्यगृहे सॅनिटाइज करण्यात येणार आहे. आजारी व्यक्तिने नाट्यगृहाकडे न येण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. (play theaters reopen soon in maharashtra)

‘एका लग्नाची पुढची गोष्ट’च्या पहिल्या प्रयोगाला मिळणारा प्रतिसाद आणि कोरोना नियमांचं होणारं पालन पाहिल्यानंतर इतर निर्माते, दिग्दर्शकही त्यांची नाटकं नाट्यगृहात लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर होणाऱ्या या पहिल्यावहिल्या प्रयोगाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (play theaters reopen soon in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

 31 डिसेंबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवला, ठाकरे सरकारचा निर्णय

‘इम्युनिटी स्टोन’साठी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे आयुष्य चव्हाट्यावर, नव्या रहस्यांनी प्रेक्षक स्तब्ध!

‘थलायवा’ रजनीकांत पुढच्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात? लवकरच घोषणा होणार!

शुभमंगल सावधान! अभिनेत्री सई लोकूर विवाहबंधनात

(play theaters reopen soon in maharashtra)