कृपया या प्रकरणाचं भांडवल करु नका, माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होतोय : पंकजा मुंडे

मुंबई :  अमेरिकेतील हॅकरने लंडनमध्ये केलेल्या दाव्यांमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत देशभरात खळबळ उडाली आहे. ईव्हीएम हॅकिंगची माहिती असल्यामुळे गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा दावा हॅकरने केला. हॅकरच्या या दाव्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेऊन त्याला उत्तर दिलं. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हॅकरचे दावे खोडून काढलेच, शिवाय खळबळ […]

कृपया या प्रकरणाचं भांडवल करु नका, माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होतोय : पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई :  अमेरिकेतील हॅकरने लंडनमध्ये केलेल्या दाव्यांमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत देशभरात खळबळ उडाली आहे. ईव्हीएम हॅकिंगची माहिती असल्यामुळे गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली, असा दावा हॅकरने केला. हॅकरच्या या दाव्यानंतर भाजपने पत्रकार परिषद घेऊन त्याला उत्तर दिलं. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हॅकरचे दावे खोडून काढलेच, शिवाय खळबळ उडवून देणं हे काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा आरोपही केला. यावर प्रथमच गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मौन सोडलंय. या प्रकरणाचं भांडवलं करु नये, यामुळे माझ्या कुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावं लागतंय, असं आवाहन त्यांनी केलंय.

या विषयावर काय बोलावं हा प्रश्न आहे. मी हॅकर नाही, मी एक कन्या आहे. अशा गोष्टींना काय उत्तर द्यावं? एका कन्येला अशा प्रकरणावर विश्वास करणं कठीण आहे. माझ्या कुटुंबाला यामुळे मानसिक त्रासातून जावं लागतंय. कृपया याचं भांडवलं करु नये. गृहमंत्री राजनाथ सिंहांकडे मी स्वतः सीबीआय चौकशीची मागणी केली होती आणि ती चौकशी पूर्ण झालेली आहे. आता पुन्हा चौकशीची मागणी असेल तर अनेक मोठे मोठे लोक यावर लक्ष ठेवून आहेत. त्याच्यावर योग्य ते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. वाचाEVM : हॅकरचे दावे आणि त्यामागचं वास्तव पाहा

काय आहेत हॅकरचे दावे?

-रिलायन्स जिओने लो फ्रिक्वेन्सी सिग्नल देऊन ईव्हीएम टॅम्पर करण्यात मदत केली. जिओच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत माहित नाही. भारतात नऊ ठिकाणी हे काम केलं जातं.

-आमच्या टीमने हस्तक्षेप केला नसता तर भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही विजय मिळवला असता.

-भारतातील एका मोठ्या पत्रकाराला ईव्हीएमची स्टोरी सांगितलेली आहे. हा पत्रकार दररोज रात्रीच्या शोमध्ये ओरडत असतो. वाचालंडनमध्ये पत्रकार परिषद घेणारे आशिष रे कोण आहेत?

-दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम्ही हॅकिंग होऊ दिली नाही. अन्यथा हे राज्यही भाजपने जिंकलं असतं.

-भाजपशिवाय सपा, बसपा आणि आपनेही ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं का याबाबत विचारणा केली.

-2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलंय हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंना माहित होतं. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी तंझिल अहमद हे गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी करत होते आणि हत्येचा गुन्हा दाखल करणार होते. पण या अधिकाऱ्याचीही हत्या करण्यात आली.

संबंधित बातम्या 

‘रॉ’ म्हणजे नेमकं काय?

EVM हॅकिंगच्या माहितीमुळेच गोपीनाथ मुंडेंची हत्या, अमेरिकन एक्स्पर्टचा दावा

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी : भुजबळ

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.