औरंगाबादेतील कार्यक्रमात मोदी महाराष्ट्राला दोन खास गोष्टी देणार

महाराष्ट्रातील बचत गटांच्या महिलांना नरेंद्र मोदी (PM Modi Aurangabad) संबोधित करणार आहेत. मोदी (PM Modi Aurangabad) महाराष्ट्रासाठी दोन खास गोष्टी देणार आहेत. एक म्हणजे हजारो हातांना काम देणाऱ्या औरीक सिटीचं मुख्यालयाचं उद्घाटन आणि दुसरं महिलांसाठी खास घोषणा केली जाऊ शकते.

औरंगाबादेतील कार्यक्रमात मोदी महाराष्ट्राला दोन खास गोष्टी देणार

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Aurangabad) हे शनिवारी औरंगाबादमध्ये कार्यक्रमाला संबोधित करतील. औरंगाबाद शहरात दोन प्रमुख कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत. यातला पहिला कार्यक्रम म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल करिडॉरमधील औरीक सिटीच्या (AURIC City) भव्य हॉलचे त्यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील बचत गटांच्या महिलांना नरेंद्र मोदी (PM Modi Aurangabad) संबोधित करणार आहेत. मोदी (PM Modi Aurangabad) महाराष्ट्रासाठी दोन खास गोष्टी देणार आहेत. एक म्हणजे हजारो हातांना काम देणाऱ्या औरीक सिटीचं (AURIC City) मुख्यालयाचं उद्घाटन आणि दुसरं महिलांसाठी खास घोषणा केली जाऊ शकते.

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद असा त्यांचा दौरा आहे. नागपूरचा कार्यक्रम अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आलाय. सर्वात महत्वाचे दोन कार्यक्रम औरंगाबाद शहरात होत आहेत. शनिवारी दुपारी एक वाजता नरेंद्र मोदी (PM Modi Aurangabad) हे देशातील पहिल्या औरीक सिटीतील ग्लोबल इमारतीचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर राज्यातील बचत गटातील असंख्य महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.

औरीक सिटी हा केंद्र सरकारचा एक महत्वकांक्षी उपक्रम आहे. यात पंचतारांकित औद्योगिक वसाहत उभारली जात आहे. यासाठी औरंगाबाद परिसरातील शेंद्रा आणि बिडकीन परिसरातील तब्बल दहा हजार हेकटर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. या जमिनीवर जगभरातील नामांकित उद्योग आपले उद्योग उभारणार आहेत. या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे आणि हजारो बेरोजगार हातांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योग सुरूही झाले आहेत. औरीक सिटी या संपूर्ण उद्योगाचे आणि निवासी वसाहतीचे नियमन करणारी संस्था असणार आहे. ज्याच्या प्रमुख इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

या इमारतीचे उद्घाटन पार पडल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातून आलेल्या असंख्य महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्रालायमार्फत करण्यात आलं आहे. औरीक सिटी शेजारी उभारण्यात आलेल्या भव्य आणि आधुनिक पेंडॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून तब्बल एक लाख महिला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज ग्रामविकास खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बचत गटाच्या महिला उद्या कार्यक्रमाला येत असल्यामुळे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बचत गटाच्या अनुषंगाने एक मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यासाठी औरंगाबाद शहरात प्रशासनाने तगडा बंदोबस्त उभारला आहे. महसूल विभागाचे एक हजार कर्मचारी, तर पोलीस दलाचे तब्बल अडीच हजार कर्मचारी या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस राबत आहेत. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी तब्बल तीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा संपूर्ण शहर आणि कार्यक्रमस्थळी तगडा बंदोबस्त असणार आहे. या कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांच्यासह सगळे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून उभे आहेत. तर मुंबई आणि दिल्लीतील सगळे सुरक्षा कर्मचारी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी औरंगाबाद शहरात तळ ठोकून आहेत. या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह जवळपास सगळेच मंत्री झाडून उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हा दौरा पूर्ण शासकीय आणि विकासकामांचे उद्घाटन करणारा असला तरी निवडणुकांच्या तोंडावर आयोजित करण्यात आलेला हा दौरा राजकीय असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना हा दौरा विकासाच्या मोठ्या घोषणा करून मतांचा जोगवा मागण्यासाठी काढलेला असल्याची टीका करण्यात येत आहे.

मराठवाडा हा सातत्याने दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो, मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सगळीकडे घवघवीत यश मिळालं होतं, मात्र मराठवाड्यात म्हणावं असं यश मिळालं नव्हतं, मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण 48 जागा आहेत. मात्र भाजपला यातल्या फक्त 17 जागांवर यश मिळवता आलं होतं, तर इथे काँग्रेस आणि शिवसेनेने तुलनेने जास्त आमदार निवडून आणले होते. आता नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याने मराठवाड्यातली काही राजकीय गणिते बदलतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *