नाशिकमध्ये सभा घेऊन मोदी आठवडाभर देशाबाहेर

यावेळी मोदींच्या विविध बैठका होतील आणि ते भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी 19 सप्टेंबरला मोदी नाशिकमध्ये भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहतील. नाशिकमधील सभेनंतर मोदी आठवडाभर देशाबाहेर असतील.

नाशिकमध्ये सभा घेऊन मोदी आठवडाभर देशाबाहेर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवडाभर भारताबाहेर (PM Modi US Visit 2019) असतील. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक बैठकीसाठी पंतप्रधान मोदी अमेरिका (PM Modi US Visit 2019) दौऱ्यावर जात आहे. यावेळी मोदींच्या विविध बैठका होतील आणि ते भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी 19 सप्टेंबरला मोदी नाशिकमध्ये भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहतील. नाशिकमधील सभेनंतर मोदी आठवडाभर देशाबाहेर असतील.

नाशिकमध्ये 18 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रॅली होईल. दुपारी 2 वाजता रॅली सुरु होऊन, पाथर्डी फाटा ते त्रंबक नाका, रविवार कारंजा मार्गे पंचवटी कारंजा येथे येऊन यात्रेचा समारोप होईल. यानंतर 19 सप्टेंबरला पंचवटीतील साधू ग्राम, तपोवन येथे पंतप्रधान मोदींची सभा होईल.

मोदींचा अमेरिका दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 सप्टेंबर सायंकाळी अमेरिकेसाठी रवाना होतील. मोदींचा पहिला मुक्काम टेक्सास या अमेरिकन राज्यातील प्रसिद्ध शहर हॉस्टनमध्ये असेल. या शहरात मोदी ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिकांची भेट घेतील. यानंतर मोदी भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या “Howdy, Modi!” या कार्यक्रमाला संबोधित करतील. या कार्यक्रमाला भारतीय समुदायातील 50 हजार पेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या रस्त्यांवर मोदींचे बॅनर, भाषण ऐकण्यासाठी फुटबॉल स्टेडिअम हाऊसफुल्ल

रविवारी सायंकाळी मोदी न्यूयॉर्कसाठी रवाना होतील, जिथे ते 23 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र वातावरण बदल परिषदेला (UN Climate Action Summit) संबोधित करतील. याच काळात मोदी संयुक्त राष्ट्राच्या सत्राव्यतिरिक्त इतर बैठकांनाही उपस्थित राहतील, ज्यावर जागतिक आरोग्य आणि दहशतवादावर भर देण्यात येईल. यूएन सत्राच्या व्यतिरिक्त मोदी 12 पेक्षा जास्त बैठका घेणार आहेत, ज्यामध्ये भारतात गुंतवणूक आणण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं जाईल.

मोदींचा अमेरिका दौरा : भाषण ऐकण्यासाठी 40000 जागा आत्ताच बूक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *