PM Narendra Modi | ‘2 वेळा पंतप्रधान झालात, आता पुरे!’ असं मोदींना नेमकं कुणी म्हटलं? शरद पवार तर नव्हेत?

PM Narendra Modi | '2 वेळा पंतप्रधान झालात, आता पुरे!' असं मोदींना नेमकं कुणी म्हटलं? शरद पवार तर नव्हेत?
Image Credit source: ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या या प्रसंगातले विरोधक महाराष्ट्राचे नेते शरद पवारच असावेत, अशी चर्चा आता सुरु आहे. कारण महिनाभरापूर्वीच केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांची तक्रार घेऊन शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली होती.

मंजिरी धर्माधिकारी

|

May 13, 2022 | 10:26 AM

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना 2024 मध्ये पराभूत करण्यासाठी तुल्यबळ चेहरा अद्याप मिळत नसल्याने विरोधक चिंतेत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वीच एक विरोधक (Opposition leader ) मला भेटण्यासाठी आले होते. या भेटीत त्यांनी मला एक वाक्य म्हटलं होतं. देशाचे दोन वेळा पंतप्रधान (PM Twice) झालात, आता तुम्हाला आणखी काय हवंय? असा प्रश्न त्यांनी मला विचारला होता, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. मात्र त्यांना उत्तर देताना मला भारतात स्थैर्य, शांतता आणि लोकोपयोगी योजना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या पहायच्या आहेत, असं उत्तर दिल्याचंही मोदींनी सांगितलं. गुजरातमधील एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हा प्रसंग सांगितला. ‘आता पुरे’ म्हणणाऱ्या या विरोधकाचं नाव मोदींनी जाहीर केलं नाही. त्यामुळे नेमका हा नेता कोण, याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहेत.

पंतप्रधानांनी सांगितलेला किस्सा काय?

गुजरातमधील भरुच येथील उत्कर्ष समारोहाला ऑनलाइन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. गुजरातचे सुपुत्र असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मातीची महती सांगताना हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, एक दिवस एक विरोधी नेते मला भेटण्यासाठी आले. मी त्यांचा नेहमी आदर करतो. काही गोष्टींमुळे ते असमाधानी होते. त्यामुळे ते माझ्याकडे भेटण्यासाठी आले होते. ते म्हणाले, देशानं तुम्हाला दोन वेळा पंतप्रधान बनवलं. आता तुम्हाला आणखी काय हवंय? त्यांना म्हणायचं होतं की, दोन वेळा पंतप्रधान झाल्यानंतर तुम्ही सर्वकाही मिळवलंय.. पण मी त्यांना सांगितलं. मला देशात स्थैर्य हवंय. कल्याणकारी योजना 100 टक्के राबवलेल्या पहायच्या आहेत…. त्यांना माहिती नाही मी वेगळ्या मातीतून घडलोय. हीच ती गुजरातची माती आहे. त्यामुळेच जे घडलंय ते घडू द्यात, आता आपण आराम करू.. असं म्हणणाऱ्यांपैकी मी नाही. मला देशात स्थैर्य आणायचंय….’

मोदींच्या किश्श्यातले नेते शरद पवार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या या प्रसंगातले विरोधक महाराष्ट्राचे नेते शरद पवारच असावेत, अशी चर्चा आता सुरु आहे. कारण महिनाभरापूर्वीच केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात शिवसेना खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांविरोधात उघडलेल्या तपास मोहीमांची तक्रार करण्यासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री होते. आता भाजप प्रणित केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. ही आठ वर्ष सेवा, गरीबांचं कल्याण आणि सुशासनासाठी अर्पण केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून सांगितलं.

मोदींना पर्यायी चेहरा देण्याबाबत पवार काय म्हणाले?

आपल्याला पंतप्रधान व्हायचंय, असं शरद पवार थेट कधीही म्हणाले नसले तरीही त्यांची ही महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. यापूर्वी त्यांनी अनेकदा पंतप्रधान पदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांची संधी हुकली. आता देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा तुल्यबळ चेहरा शोधण्याची नितांत गरज आहे. मागील आठवड्यातच एका पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यायी चेहरा देण्याबाबत वक्तव्य केलं होतं. विरोधी पक्षांची मोट बांधण्यात आम्हाला विलंब होतोय, असं पवार यांनी मान्य केलं होतं..


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें