राणा दाम्पत्याच्या अटकेच्या निषेधार्थ बडनेरा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको, युवा स्वाभिमानचे 22 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

बडनेरा रेल्वे स्थानकावर आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि युवा स्वाभिमानच्या 20 ते 22 कार्यकर्त्यांना बडनेरा रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राणा दाम्पत्याच्या अटकेच्या निषेधार्थ बडनेरा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको, युवा स्वाभिमानचे 22 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 7:46 AM

अमरावती : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यासाठी मुंबईला निघालेल्या आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यानंतर बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या शेतकऱ्यांनी आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या अटकेच्या निषेधार्थ बडनेरा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन केलं (Police Action against Yuva Swabhiman Activist in Badner for Railway Roko).

या आंदोलनांतर्गत विदर्भ एक्सप्रेस रेल्वे अर्धा तास रोखून धरण्यात आली. या रेल्वे स्थानकावर आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि युवा स्वाभिमानच्या 20 ते 22 कार्यकर्त्यांना बडनेरा रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, याआधी पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना ताब्यात घेतलं होतं. राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थासमोर सोमवारी (16 नोव्हेंबर) आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, रेल्वे स्टेशनवर जाण्यापूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या निवासस्थानाला पोलिसांनी घेराव घातला. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला पोलीस आयुक्तालयात नेले. पोलिसांच्या या कारवाईविरोधात राणा दाम्पत्याने पोलीस आयुक्त कार्यालयाच्या पायरीवर आंदोलन पुकारलं.

विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी, लॉकडाऊन काळातील विजेचे बिल निम्मे माफ करावे, या मागणीसाठी नवनीत राणा आणि रवी राणा शेतकर्‍यांसह आज मुंबईसाठी निघणार होते. राणा दाम्पत्याला पोलीस आयुक्तालयात आणताच आपल्याला कोणत्या गुन्ह्याखाली ताब्यात केलं? असा प्रतिसवाल करत त्यांनी पोलीस आयुक्तालयाच्या पायऱ्यांवरच आंदोलन सुरु केलं.

तीन दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी याच मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे चक्काजाम आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आमदार रवी राणा आणि त्यांसह आंदोलनात सहभागी झालेले काही शेतकरी अमरावती मध्यवर्ती कारागृहातून आज जामिनावर सुटले. ते आज मुंबईला रवाना होणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

रवी राणा आणि शेतकऱ्यांच्या अटकेचा फडणवीसांकडून निषेध

दरम्यान, रवी राणा यांच्या अटकेचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला होता. ‘शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो’, अशा शब्दात रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्विटरवरुन निषेध नोंदवला होता.

संबंधित बातम्या :

आंदोलन केलं की अटक, लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का? रवी राणा यांच्या अटकेवर फडणवीसांचा सवाल

राज्यात मुख्यमंत्र्यांची हुकूमशाही, राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारखी परिस्थिती : रवी राणा

‘मातोश्री’बाहेर आंदोलनाचा इशारा, राणा दाम्पत्य मुंबईच्या दिशेला रवाना होण्याआधीच पोलिसांचा घेराव

संबंधित व्हिडीओ :

Police Action against Yuva Swabhiman Activist in Badner for Railway Roko

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.