राम मंदिर भूमिपूजनाच्या जल्लोषावर निर्बंध, अहमदनगरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा

राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध पक्ष आणि संघटनांना कलम 149 अंतर्गत नोटीसा देण्यात आल्या (Notice to MNS Activist) आहेत.

राम मंदिर भूमिपूजनाच्या जल्लोषावर निर्बंध, अहमदनगरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा

अहमदनगर : अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध पक्ष आणि संघटनांना कलम 149 अंतर्गत नोटीसा देण्यात आल्या आहेत. अहमदनगरला मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. यात उद्या होणाऱ्या जल्लोषावर निर्बंध घालण्यात आले आहेत. (Notice to MNS Activist on Ayodhya Ram Mandir Bhumi Poojan)

मनसेने फटाक्याची आतषबाजी करत आपला आनंद साजरा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आजपासून विविध संघटनांच्या पदाधिकारी यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. जर या नोटिसांचे पालन न केल्यास कार्यकर्त्यांवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचे गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

या नोटीशीत कुठल्याही प्रकारचे जल्लोष, विजय मिरवणूक, फटाक्यांची आतीषबाजी, घोषणाबाजी, शुभेच्छा फ्लेक्स बोर्ड लावणे या व्यतिरिक्त भूमिपूजनाच्या अनुषंगाने सोशल मीडियावर होमहवन, सामूहिक पूजा, नमाज पठण हे कुठलेही कृत्य करु नये.

त्यासंबंधित सोशल मीडियावर विशिष्ट फोटो अथवा मजकूर शेअर करेल, जेणेकरुन दोन धर्मियांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा स्वरूपाची कुठलेही कृत्य करू नये, असे यात नमूद करण्यात आलं आहे.

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी

ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहेत, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून उद्या (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता भूमिपूजन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 9.35 वाजता दिल्लीहून अयोध्येला रवाना होतील. साधारण 11.30 वाजता अयोध्या साकेत कॉलेज हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर हनुमानगढी येथे पोहोचून ते दर्शन आणि पूजा करतील. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याभरापासूनच अयोध्येत भक्तांची गर्दी वाढली आहे. अयोध्येत घर आणि मंदिरांना रंगरंगोटी, विद्युत रोषणाई केल्याने अक्षरशः दिवाळीचे स्वरुप आले आहे. (Notice to MNS Activist on Ayodhya Ram Mandir Bhumi Poojan)

संबंधित बातम्या : 

Ayodhya Ram Mandir | अयोध्यानगरी सजली, राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन विक्रम प्रताप सिंग अयोध्येत!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *