मराठा आंदोलनातील गुन्ह्यांप्रकरणी मराठा तरुणांना पोलिसांच्या नोटीस

औरंगाबाद : मराठा आंदोलनप्रकरणी औरंगाबादमधील मराठा तरुणांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मराठा आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्याप्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यांशी संबंधितच या नोटीस आहेत. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील 80 टक्के गुन्हे मागे घेतल्याचे सांगितले होते. तसेच उर्वरीत गुन्हेही मागे घेऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात […]

मराठा आंदोलनातील गुन्ह्यांप्रकरणी मराठा तरुणांना पोलिसांच्या नोटीस
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

औरंगाबाद : मराठा आंदोलनप्रकरणी औरंगाबादमधील मराठा तरुणांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मराठा आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्याप्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यांशी संबंधितच या नोटीस आहेत. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील 80 टक्के गुन्हे मागे घेतल्याचे सांगितले होते. तसेच उर्वरीत गुन्हेही मागे घेऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात नोटीस आल्याने मराठा तरुणांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या नोटीस आल्यानंतर मराठा तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित मराठा तरुणांना रस्ता अडवणे, जाळपोळ करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे याप्रकरणी नोटीस दिल्या आहेत. यात या तरुणांना त्यांच्यावर दंडाची आकारणी व इतर कायदेशीर कारवाई का करु नये, अशीही विचारणा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याची भावना मराठा समाजकडून व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले?

“मराठा आंदोलनावरील 80 टक्के केसेस मागे घेण्यात आल्या आहेत. उर्वरीत केसेसही लवकरच मागे घेतल्या जातील. त्यासाठी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती पूर्ण केल्यावर केसेस मागे घेण्यात येतील.”, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दिले होते.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

“संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यायला 10 वर्षे लागली आहेत. सकल मराठा क्रांती मोर्चा आणि भीमा कोरेगाव वेळी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, गुन्हे मागे घेण्याची एक मोठी प्रक्रिया असते हे समजून घ्यावे.” असे महसूलमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी सांगलीत म्हटले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे दोघेही मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची भाषा बोलत होते. मात्र, प्रत्यक्षात मराठा तरुणांना थेट नोटीस येत असल्याने मराठा समाजात असंतोषाचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या : मराठा आंदोलकांवरील 80 टक्के केस मागे, उर्वरीतही मागे घेऊ : मुख्यमंत्री

व्हिडीओ पाहा:

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.