कोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत

कोरोनामुक्त होऊन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर सोमवारी कर्तव्यावर हजर झाले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पवृष्टी आणि बँडच्या गजरात स्वागत केले. (Police Officers and Constables welcomes Police Commissioner Vivek Phansalkar)

कोरोनावर मात, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे पुष्पवृष्टी अन् बँडच्या गजरात स्वागत

ठाणे: लॉकडाऊन काळात शहर पोलीस दलातील कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या कर्मचाऱ्यांची ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर लक्षपूर्वक काळजी घेत होती. 6 सप्टेंबरला कोरोना पोलीस आयुक्तांचीच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन आयुक्त सोमवारी कर्तव्यावर हजर झाले. आयुक्त विवेक फणसाळकर यांचे कार्यालयात आगमन होताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी आणि बँडच्या गजरात त्यांचे स्वागत केले. (Police Officers and Constables welcomes Police Commissioner Vivek Phansalkar)

विवेक फणसळकर यांना खोकला आणि ताप येत होता. त्यामुळे त्यांनी कोरोनाची तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट 6 सप्टेंबर रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 दिवस उपचार घेतल्यानंतर फणसाळकर यांनी कोरोनावर मात केली. 16 सप्टेंबरला पोलीस आयुक्तांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर फणसळकर कर्तव्यावर हजर झाले. पोलीस आयुक्तालय कार्यालयात त्यांचे आगमन होताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी व बँड वाजवून जोरदार स्वागत केले.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांतीनंतर कर्तव्यावर हजर

10 दिवसांच्या उपचारानंतर विवेक फणसाळकर 16 सप्टेंबरला कोरोनामुक्त झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनातून बरे झाल्यानंतर फणसाळकर यांनी विश्रांती घेतली. दरम्यान, पूर्णपणे ठणठणीत झालेले पोलीस आयुक्त सोमवारी जनसेवेसाठी पुन्हा कर्तव्यावर हजर झाले.

संबंधित बातम्या :

ठाणे, कल्याण, सातारा, वसई-विरारमध्ये पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य

Thane | खड्डेमय ठाणे, घोडबंदरमध्ये उड्डाण पुलावरील खड्ड्यांनी नागरिक बेजार

(Police Officers and Constables welcomes Police Commissioner Vivek Phansalkar)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *