नागपुरात दारुड्या पोलिसाचा धिंगाणा, शाळेतील मुलींवर पैसे उधळले!

नागपूर : पोलिस म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणारा माणूस. मात्र, नागपुरात हे तत्त्व प्रमोद वाळके या अंमलदाराने धुळीस मिळवलं आहे. दारु प्यायलाने नशेत असलेल्या प्रमोद वाळके या पोलिसाने शालेय विद्यार्थिनींवर पैसे उधळले आहेत. मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात म्हणजे नागपुरात ही खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर नागपूरसह संपूर्ण राज्यभऱातून संताप …

नागपुरात दारुड्या पोलिसाचा धिंगाणा, शाळेतील मुलींवर पैसे उधळले!

नागपूर : पोलिस म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणारा माणूस. मात्र, नागपुरात हे तत्त्व प्रमोद वाळके या अंमलदाराने धुळीस मिळवलं आहे. दारु प्यायलाने नशेत असलेल्या प्रमोद वाळके या पोलिसाने शालेय विद्यार्थिनींवर पैसे उधळले आहेत. मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात म्हणजे नागपुरात ही खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर नागपूरसह संपूर्ण राज्यभऱातून संताप व्यक्त केला जात आहे.

नागपुरात 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनी नृत्यू करत होत्या. त्यावेळी नांद पोलिस चौकीतील अंमलदार प्रमोद वाळके याने या विद्यार्थिनींवर पैशांची उधळण केली. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील नांद या गावी ही खळबळजनक घटना घडली आहे.

या घटनेनंतर नांद गावचे ग्रामस्थ प्रचंड संतापले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्याने गोंधळ घातला, असा आरोप करत, त्यांनी या घटनेचा निषेधही व्यक्त केला आहे. प्रमोद वाळके या अंमलदाराने दारु पिऊन धिंगणा घातल्याची माहितीही नांदच्या गावकऱ्यांनीच दिली.

एकीककडे कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजत असताना, ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची, तेच धिंडवडे काढत आहेत. त्यामुळे अर्थात जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *