अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे, मुस्लीम युवकाचा जेजुरीच्या खंडोबाला नवस

नाशिक :  राजकीय नेत्यांवरील आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी समर्थक काय करतील याचा अंदाज बांधणं तसं कठिण असतं. असाच काहिसा प्रकार नाशिकमध्येही समोर आला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींना बराच वेळ शिल्लक आहे. त्याआधी सर्वांचे लक्ष्य लोकसभा निवडणुकीवर आहे. मात्र, निफाड तालुक्यातील चांदोरीच्या मुस्लीम तरुणाने विधानसभेत आपल्या नेत्यांना यश मिळावे यासाठी थेट जेजुरीच्या खंडोबाला नवस केला आहे. …

अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे, मुस्लीम युवकाचा जेजुरीच्या खंडोबाला नवस

नाशिक :  राजकीय नेत्यांवरील आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी समर्थक काय करतील याचा अंदाज बांधणं तसं कठिण असतं. असाच काहिसा प्रकार नाशिकमध्येही समोर आला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींना बराच वेळ शिल्लक आहे. त्याआधी सर्वांचे लक्ष्य लोकसभा निवडणुकीवर आहे. मात्र, निफाड तालुक्यातील चांदोरीच्या मुस्लीम तरुणाने विधानसभेत आपल्या नेत्यांना यश मिळावे यासाठी थेट जेजुरीच्या खंडोबाला नवस केला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत निफाड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीप बनकरांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता. ही बाब 5 वर्षांपासून मनात सलत असल्याने मुस्लीम धर्माचा पवित्र रमजान महिना चालू असतानाही आपण नवस केल्याचे चांदोरीच्या मुजम्मील शकुर इनामदार या युवकाने सांगितले. त्याने जेजुरीच्या खंडोबाला निफाड विधानसभा मतदारसंघात दिलीप बनकर यांच्या विजयासाठी नवस केला. या नवसात त्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान व्हावे अशीही मनोकामना व्यक्त केली आहे.

लोकसभेच्या निकालानंतर राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या कार्यकर्त्याच्या नवसाला खंडोबा किती पावेल हे येणारा काळच ठरवेल. मात्र, या नवसाच्या निमित्ताने मुस्लीम युवकाची धर्मापलिकडे जाऊन केलेली उपासना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *